Ramayana Sita Sai Pallavi : रामायणमधील ‘सीता’ मेकअपशिवायही दिसते सुंदर, काय आहे अभिनेत्री साई पल्लवीचे ब्युटी सिक्रेट?

Ramayana Sita Sai Pallavi : रामायणमध्ये सीतेची भूमिका साकारणारी अभिनेत्री साई पल्लवी मेकअपशिवायही तिच्या नैसर्गिक सौंदर्यामुळे चाहत्यांचे लक्ष वेधून घेते. त्वचेचा नैसर्गिक ग्लो टिकवण्यासाठी ती कोणत्या गोष्टींना प्राधान्य देते आणि तिचे ब्युटी रुटीन कसे आहे, जाणून घ्या.

Ramayana Sita Sai Pallavi : रामायणमधील सीता मेकअपशिवायही दिसते सुंदर, काय आहे अभिनेत्री साई पल्लवीचे ब्युटी सिक्रेट?
Ramayana Sita Sai Pallavi
| Edited By: | Updated on: Nov 07, 2026 | 1:50 PM

रामायण चित्रपटात सीतेची भूमिका साकारणारी अभिनेत्री साई पल्लवी तिच्या अभिनयासोबतच साध्या राहणीमानासाठी आणि नैसर्गिक सौंदर्यासाठीही ओळखली जाते. अनेक इव्हेंट्स आणि चित्रपटांमध्येही ती मेकअपशिवाय दिसली आहे. बहुतांश अभिनेत्री वेगवेगळ्या मेकअप प्रोडक्ट्सचा वापर करताना दिसतात; मात्र साई पल्लवी नैसर्गिक सौंदर्याला अधिक महत्त्व देते. त्वचेची काळजी घेण्यापासून ते केसांची निगा राखण्यापर्यंत तिच्या रुटीनमध्ये काही साध्या गोष्टींचा समावेश असल्याचे सांगितले जाते. चला तर जाणुन घ्या साई पल्लवीचे ब्युटी सिक्रेट

साई पल्लवी आपल्या आहारात हेल्दी पदार्थांचा समावेश करण्याचा प्रयत्न करते. तिच्या डाएटमध्ये विविध भाज्या, फळे आणि ड्राय फ्रूट्स यांचा समावेश असतो. याशिवाय दिवसभर पुरेसे पाणी पिण्यावरही ती भर देते. शरीराला योग्य प्रमाणात पाणी मिळाल्याने त्वचेतील ओलावा टिकवण्यास मदत होते.

Loading...

स्किन केअरसाठी नॅचरल प्रोडक्टचा वापर

त्वचेची काळजी घेण्यासाठी साई पल्लवीचे रुटीन साधे आणि नैसर्गिक असल्याचे सांगितले जाते. ती हळद, कडुनिंबाची पावडर आणि मध यांसारख्या नैसर्गिक पदार्थांना प्राधान्य देते. तसेच जास्त केमिकल्स असलेली स्किन केअर उत्पादने आणि लॅबमेड सिरम वापरणे टाळते.

फेअरनेसऐवजी निरोगी त्वचेला महत्त्व

साई पल्लवीच्या मते, सौंदर्याचा संबंध केवळ गोऱ्या रंगाशी नसतो. त्वचा निरोगी असणे अधिक महत्त्वाचे आहे. त्यामुळेच तिने यापूर्वी फेअरनेस क्रीमच्या जाहिरातीची ऑफर नाकारल्याचे सांगितले जाते. त्वचेचा नैसर्गिक रंग बदलण्याऐवजी तो स्वीकारावा आणि त्वचेच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे, असा तिचा दृष्टिकोन आहे.

मेकअपपेक्षा नैसर्गिक लुकला पसंती

साई पल्लवी अनेकदा कमी किंवा अजिबात मेकअप न करताच सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसते. चित्रपटांमध्येही ती शक्यतो कमीत कमी मेकअप वापरणे पसंत करते. चेहऱ्यावर बराच वेळ मेकअप ठेवल्याने काही जणांना व्हाइटहेड्स, ब्लॅकहेड्स आणि ओपन पोर्ससारख्या समस्या जाणवू शकतात. त्यामुळे मेकअप केल्यानंतर तो योग्य पद्धतीने काढणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

नियमित व्यायाम करण्यावर भर

त्वचा निरोगी आणि चमकदार राहण्यासाठी साई पल्लवी नियमित व्यायाम करण्याला महत्त्व देते. व्यायामामुळे शरीर तंदुरुस्त ठेवण्यास मदत होते. तसेच शारीरिक हालचालींचा त्वचेच्या आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होऊ शकतो.

हेअर केअर रूटनीही नैसर्गिक

साई पल्लवीचे लांबसडक आणि दाट केसही अनेकांचे लक्ष वेधून घेतात. केसांची निगा राखताना ती केमिकल्सयुक्त शाम्पू आणि हेअर केअर उत्पादनांचा वापर टाळण्याचा प्रयत्न करते. त्याऐवजी कोरफड सारख्या नैसर्गिक घटकांना प्राधान्य देते. केसांना रंग देण्याऐवजी त्यांचा नैसर्गिक रंग कायम ठेवणेही तिला आवडते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us