Ramayana मध्ये रणबीरच्या जागी सलमान खान श्रीराम म्हणून कसा दिसला असता? ‘तो’ फोटो पाहून व्हाल अवाक्
Ramayana Teaser: प्रभू श्रीराम यांच्यावर आधारलेला 'रामायण' सिनेमा दिवळी 2026 पर्यंत मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार असल्याची शक्यता आहे... नुकताच सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला असून अनेकांना कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहे. पण सिनेमात रणबीर कपूर याच्या जागी अभिनेता सलमान खान नाही तर हृतिक रोशन कसा दिसला असता... त्यांचे फोटो सध्य समोर येत आहेत.

Ramayana Teaser : बॉक्स ऑफिसवर सध्या ‘धुरंधर 2’ सिनेमा राज्य करत आहे तर, दुसरीकडे सोशल मीडियावर फक्त आणि फक्त ‘रामायण’ सिनेमाची चर्चा सुरु आहे. हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर सिनेमाचा एक टीझर प्रदर्शित करण्यात आला. ज्यामुळे सर्वत्र फक्त रामायण सिनेमाची चर्चा रंगली आहे. फक्त चाहतेच नाही तर, सेलिब्रिटी देखील सिनेमाच्या टीझरचं कौतुक करत आहेत… एकीकडे सिनेमातील कलाकारांवर कौतुकांचा वर्षाव होत आहे तर, दुसरीकडे AI च्या मदतीने बनवलेले फोटो व्हायरल होत आहेत. फोटोमध्ये रणबीर नाही तर, अन्य कोणता अभिनेता चांगला दिसला असता… असे अभिनेत्यांचे फोटो व्हायरल झाले आहे.
सोशल मीडियावर सेलिब्रिटींचा व्हायरल AI फोटो तर अनेकांनी पाहिलेच असतील. पण सर्वात आधी जाणून घ्या सिनेमात श्रीरामांच्या भूमिके अभिनेता रणबीर कपूर आहे. तर रावणाच्या भूमिकेत अभिनेता यश आहे. सीता मातेच्या भूमिकेला अभिनेत्री साई पल्लवी हिने न्याय दिला आहे… तर लक्ष्मणाच्या भूमिकेत अभिनेता रवी दुबे आहे आणि सनी देओल हनुमानजींच्या भूमिकेत दिसणार आहे.
X वर प्रयाग तिवारी (@theprayagtiwari) नावाच्या नेटकऱ्याने AI च्या मदतीने अनेक सेलिब्रिटींना श्रीरामांच्या रुप दिला आहे… सध्या फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. प्रयाग याने अभिनेत्यांचे फोटो पोस्ट केले आहेत आणि तुमचा आवडता राम निवडा असं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.
प्रयाग याने पहिला फोटो अभिनेता हृतिक रोशन याचा पोस्ट केला आहे. ज्यामध्ये हृतिक हुबेहूब रणबीर कपूर याच्यासारखाच दिसत आहे. फोटोमध्ये हृतिक अयोध्येत प्रवेश करताना दिसत आहे. फोटो सध्या तुफान व्हायरल होत असून, अनेकांनी कमेंट करत प्रतिक्रिया देखील दिली आहे.
@RevivalIntelX नावाच्या एका नेटकऱ्याने AI चा वापर करून अभिनेता सलमान खानला प्रभू रामाच्या रूपात सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. तर फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये, तुम्हाला हे सर्व लूक्स कसे वाटले, हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा…. असं लिहिलं आहे.
सांगायचं झालं तर, सध्या AI चा जमाना आहे… आजपर्यंत अनेक सेलिब्रिटी प्रभू श्रीरांमाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण रामानंद सागर यांच्या ‘संपूर्ण रामायण’ मालिकेला कोणीच टक्कर देऊ शकलेला नाही… आजही जेव्हा लोक श्रीरामांबद्दल बोलतात किंवा त्यांची आठवण काढतात, तेव्हा त्यांना अनेकदा ती भूमिका साकारणारे भाजप खासदार आणि अभिनेते अरुण गोविल आठवतात.