Ramesh Deo : ठाकूरांचा ‘देव’ होण्यापासून ते पहिल्या चित्रपटापर्यंत! कसा होता रमेश देव यांचा प्रवास?

| Updated on: Feb 02, 2022 | 11:56 PM

Ramesh Deo no more : रमेश देव यांच्या जन्म झाला होता कोल्हापुरात. ते मूळचे राजस्थानमधील होते. राजस्थानच्या जोधपूरमधूळ ठाकूर घराण्यातील असलेले रमेश यांनी एक काळ मराठीसह हिंदी सिनेसृष्टी गाजवली.

Ramesh Deo : ठाकूरांचा देव होण्यापासून ते पहिल्या चित्रपटापर्यंत! कसा होता रमेश देव यांचा प्रवास?
रमेश देव यांचा सिनेसृष्टीतील प्रवास कसा होता?
Follow us on

वयाच्या 93व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलेल्या रमेश देव (Ramesh Deo no more) यांच्या जन्म झाला होता कोल्हापुरात. ते मूळचे राजस्थानमधील होते. राजस्थानच्या जोधपूरमधूळ ठाकूर घराण्यातील असलेले रमेश यांनी एक काळ मराठीसह हिंदी सिनेसृष्टी गाजवली (Complete filmography of Ramesh Deo). फक्त मराठी सिनेमा किंवा हिंदी सिनेमाच नव्हे, तर छोट्या पडद्यावरती देखील रमेश देव यांनी आपला ठसा उमटवला होता. दिलखुलास व्यक्तिमत्त्व, अत्यंत मनमिळाऊ स्वभाव यामुळे ऑफस्क्रिनही रमेश देव यांचा चाहता वर्ग मोठा होता. आपलं संपूर्ण कुटुंब सिनेसृष्टीला वाहून दिलेलं कुटुंब म्हणजे रमेश देव यांचं कुटुंब (Family of Ramesh Deo) होय. पत्नीसह दोन्ही मुलंदेखील सिनेसृष्टीमध्ये काम करणाऱ्या या अवलियानं आपल्या स्टारडम इतर कलाकारांच्या तुलनेत स्वतःची वेगळी छाप पाडली. फक्त हिरोच्या भूमिका करणं, ही रमेश देव यांची ओळख नव्हती. कोणत्याही एका भूमिकेच्या बंधनात त्यांनी स्वतःला अडकवून घेतलं नाही. वेगवेगळ्या भूमिका करणं, हेच त्यांच्या करिअरचं वैशिष्ट्य होतं. मराठीमध्ये नायकाच्या भूमिकेत रसिक प्रेक्षकांना भावलेले रमेश देव हे हिंदीत खलनायकाच्या भूमिकेतही तितकेच दर्जेदार अभिनय करताना दिसले होते. आपल्या वर्सटाईल अभिनयानं त्यांनी अनेकांना आपली दखल घ्यायला भाग पाडलं होतं.

देव आडनावाची गोष्ट…

रमेश देव यांचं मूळ आडना खरंतर ठाकूर असं होतं. रमेश देव यांचे वडील राजर्षी शाहू महाराज यांच्या काळात न्यायलयीन कामाकाजात मदत करीत असत. तेव्हा रमेश देव यांच्या वडिलांनी शाहू महाराजांना मदत केलेली. तेव्हा शाहू महाराज हे रमेश देव यांच्या वडिलांना उद्देशून म्हणाले होते, की तुम्ही ठाकूर नाही, तरदेव आहात. तेव्हापासून खरंतर ठाकूर हे आडनाव जाऊन सगळेजण त्यांना देव या आडनावानेच संबोधू लागले होते.

रमेश देव यांनी किती सिनेमांत काम केलंय?

30हून अधिक मराठी नाटकं
190च्या वर मराठी सिनेमांत अभिनय
285पेक्षा जास्त हिंदी सिनेमात भूमिका
अनेक चित्रपट, माहितीपट आणि दूरदर्शनवरील मालिकासांठी दिग्दर्शन
राष्ट्रीय पुरस्कारानंही रमेश देव यांचा सन्मान

अभिनेते रमेश देव यांनी आपलं संपूर्ण आयुष्य हे सिनेमा, अभिनय या कलाक्षेत्राला वाहून दिलं होतं. त्यांना दोन मुलं असून दोन्ही मुलांनीही आपला विशेष ठसा या क्षेत्रात उमटवला आहे. वडिलांप्रमाणेत अजिंक्य देव अभिनय क्षेत्रात आहे. तर अभिनय देवही चित्रपटसृष्टीतच काम करत आहेत.

महत्त्वाचे सिनेमे :

रमेश देव यांनी केलेल्या अभिनयाचा पहिला किस्सा फारच इंटरेस्टिंग आहे. एका वेबसाईटनं दिलेल्या माहितीनुसार, लहान वयातच रमेश देव यांनी अभिनयाला सुरुवात केली होती. रमेश यांना त्यांचे वडील पृथ्वीराज कपूरच्या सेटवर घेऊन गेले होते. तेव्हा एका सिनेमाचं शूटिंग सुरु होतं. एक लहान मुलगा अभिनय करत होता. पण त्याच्या अभिनयानं दिग्दर्शक पृथ्वीराज कपूर यांचं समाधान होत नव्हतं. तेवढ्यात कपूर यांचं लक्ष रमेश यांच्याकडे गेलं. त्यांनी रमेश यांना ‘बेटा तू करणार का रे काम?’ अशी विचारणा केली आणि लगेचच अभिनय करण्यास सुरुवात केली. अनेकांना याची कल्पना नसेल, पण हेच रमेश देव यांचं अभिनय क्षेत्रातलं पहिलं पाऊल होतं. फक्त हिरो म्हणूनच नाही, तर व्हिलन म्हणूनही रमेश देव यांनी दर्जेदार अभिनय केला होता.

थोडक्यात, पण महत्त्वाचं..

1951 साली केलेला पाटलाची पोर हा त्यांचा पहिला चित्रपट

आंधळा मागतो एक डोळा या चित्रपटातून 1956 साली मराठी चित्रपट सृष्टीत करिअरला सुरुवात

1962 साली आरती या चित्रपटातून खलनायकाच्या भूमिकेतून हिंदीत काम करण्यास सुरुवात

पत्नी सीमा देवसोबत केलेला पहिला मराठी चित्रपट म्हणजे 1957 साली आलेला आलिया भोगासी

संबंधित बातम्या :

ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं निधन! दोन दिवसांपूर्वीच साजरा केला होता 93वा वाढदिवस

रमेश देव- सीमा देव यांची प्रेमकहाणी कशी फुलली ?