
मुंबई : 25 सप्टेंबर 2023 | अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांनी नोव्हेंबर २०२२ मध्ये लेकीचं जगात मोठ्या थाटात स्वागत केलं. दोघे कायम त्यांच्या मुलीबद्दल अनेक गोष्टी सांगत असतात. पण अद्यापही रणबीर आणि आलिया यांनी त्यांच्या लेकीचा चेहरा चाहत्यांना दाखवलेला नाही. पण दोघे कायम लेक राहा हिच्यावर असलेलं प्रेम व्यक्त करताना दिसतात. दरम्यान, रणबीर कपूर त्याच्या खास लूकमुळे चर्चेत आला आहे. अभिनेत्याचा एक व्हिडीओ सध्यो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये रणबीर याने लेकीच्या नावाची टोपी घतल्याचं दिसत आहे.
रणबीर कपूर याने घातलेल्या टोपीवर लेक राहा हिचं नाव लिहिलेलं आहे. रणबीर कपूर गणपतीचं दर्शन घेण्यासाठी टी-सीरिजच्या कार्यालयात पोहोचला होता. तेव्हा सर्वांच्या नजरा अभिनेत्याच्या टोपीवर येवून थांबल्या. व्हायरल होत असलेल्या फोटो आणि व्हिडीओमध्ये अभिनेता नेव्ही-ब्लू रंगाच्या टी – शर्टमध्ये दिसणार आहे. अभिनेत्याने कस्टमाइज टोपी घातली आहे. रणबीर याच्या टोपीवर गुलाबी अक्षरात लेक राहा हिचं नाव लिहिलं आहे.
सध्या अभिनेत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओवर एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘डॅडी गोल्स’ असं लिहिलं आहे. आलिया आणि रणबीर यांनी १४ एप्रिल २०२२ मध्ये लग्न केलं. त्यानंतर जून २०२२ मध्ये अभिनेत्रीने प्रग्नेंसीची घोषणा केली. गेल्या वर्षी ६ नव्हेंबर रोजी आलिया आणि रणबीर यांनी राहा कपूर हिचं जगात स्वागत केलं.
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न केल्याचा निर्णय घेतला. दोघांचं लग्न कुटुंबिय आणि मित्र-परिवाराच्या उपस्थितीत लग्न केलं. लग्नानंतर दोघांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. आता देखील रणबीर आणि आलिया त्यांच्या नात्यामुळे चर्चेत असते.
रणबीर कपूर लवकरच ‘एनिमल’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात अभिनेते अनिल कपूर, अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता बॉबी देओल महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. १ डिसेंबर रोजी ‘एनिमल’ सिनेमा चित्रपटगृहात झळकणार आहे. संदीप रेड्डी दिग्दर्शित सिनेमाचा टिझर २८ सप्टेंबर रोजी रणबीर याच्या वाढदिवसाच्या मुहुर्तावर प्रदर्शित होणार आहे.