AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ranbir Kapoor | रणबीर कपूर याला ईडीनं बजावलं समन्स, काय आहे प्रकरण?

Ranbir Kapoor | रणबीर कपूर याला ईडीनं बजावलं समन्स, अभिनेत्याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता... ६ ऑक्टोबर रोजी अभिनेत्याला चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे याप्रकरणी पुढे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Ranbir Kapoor | रणबीर कपूर याला ईडीनं बजावलं समन्स, काय आहे प्रकरण?
| Updated on: Oct 04, 2023 | 4:21 PM
Share

मुंबई | 04 ऑक्टोबर 2023 : अभिनेता रणबीर कपूर याच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण रणबीर कपूर याला ईडीनं समन्स बजावलं आहे. ज्यामुळे अभिनेत्याची लवकरच चौकशी होवू शकते… ऑनलाईन गेमिंग प्रकरणात अभिनेत्याला समन्स बजावण्यात आला आहे. महादेव गेमिंग ऍप जाहिरातीतील अभिनेता रणबीर कपूरला ईडीनं समन्स बजावलं आहे. ६ ऑक्टोबर रोजी अभिनेत्याला चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे याप्रकरणी पुढे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

अभिनेता संबंधित ऍपचं प्रमोशन करत होता. प्रमोशन करण्यासाठी अभिनेत्याला मोठी रक्कम, रोख स्वरूपात मिळाली होती असा दावा करण्यात आला आहे. महादेव ऍपचे संस्थापक असे 4 ते 5  ऍप्स चालवत असल्याची माहिती समोर येत आहे. फक्त भारतात नाही तर, परदेशात देखील ऍपचे कॉल सेंटर आहेत. श्रीलंका, नेपाळ, यूएईमध्ये ऍपचे कॉल सेंटर आहेत. याप्रकरणात पुढे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

रणबीर कपूर याला ईडीने समन्स बजावल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. ६ ऑक्टोबर रोजी अभिनेत्याची चौकशी होणार आहे. त्यामुळे नक्की सत्य बाहेर येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. संबंधित प्रकरणामुळे अभिनेता चर्चेत आला आहे. पण यावर अद्याप अभिनेत्याने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

याआधी देखील अनेक सेलिब्रिटींनी ईडीने समन्स बजावला आहे. टायगर श्रॉफ, नेहा कक्कर, सनी लिओनी, कृष्णा अभिषेक, राहत फतेह अली यांना देखील ईडीने समन्स बजावण्यात आलं आहे.

रणबीर कपूर याच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता लवकरच ‘एनिमल’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात अभिनेत्यासोबत अभिनेत्री रश्मिका मंदाना महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्याच्या आगामी सिनेमाची चर्चा रंगली आहे.

रणबीर कपूर फक्त त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. अभिनेत्री आलिया भट्ट हिच्यासोबत लग्न केल्यानंतर अभिनेता चर्चेत आला. लग्नाआधी दोघांनी अनेक वर्ष डेट केलं त्यानंतर रणबीर आणि आलिया यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. रणबीर आणि आलिया यांना एक मुलगी देखील आहे. त्यांच्या मुलीचं नाव राहा कपूर असं आहे.

Follow Us
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा
धारावीच्या नव्या घरांचा व्हिडिओ समोर, आता इमारतीत राहणार धारावीकर
Video : धारावीच्या नव्या घरांचा व्हिडिओ समोर, आता झोपडपट्टी नाही तर, इमारतीत राहणार धारावीकर