‘अशी गोष्ट जी करीनाकडे आहे, पण तुझ्याकडे नाही’, राणी मुखर्जीने दिलेलं उत्तर हैराण करणारं

करीना कपूर आणि राणी मुखर्जी यांच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा... राणीने अखेर मनात असलेली खंत सर्वांसमोर व्यक्त केलीच...

अशी गोष्ट जी करीनाकडे आहे, पण तुझ्याकडे नाही, राणी मुखर्जीने दिलेलं उत्तर हैराण करणारं
| Updated on: Mar 04, 2023 | 4:47 PM

मुंबई : अभिनेत्री राणी मुखर्जी आज बॉलिवूडपासून दूर असली तरी चाहत्यांमध्ये मात्र कायम चर्चेत असते. राणीच्या अनेक गोष्टी आजही चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. एक काळ असा होता जेव्हा राणी हिने एकापेक्षा एक अनेक हिट सिनेमांमध्ये काम केलं. चाहत्यांच्या मनात कायम राज्य करणारी राणी बॉलिवूडची खरी क्विन ठरली. आता सोशल मीडियाच्या विश्वात राणी सक्रिय नसली तरी, चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असते. राणीबद्दल छोटी – छोटी गोष्ट चाहत्यांमध्ये चर्चेत असते. राणी तिच्या सिनेमांमुळे तर कायम चर्चेत राहिली, पण स्वतःच्या बेधडक वक्तव्यांमुळे देखील राणी अनेकता चर्चेत आली.

एकदा राणीला विचारण्यात आलं की, अशी एक गोष्ट जी फक्त करीना कपूर हिच्याकडे नाही, पण तुझ्याकडे आहे? या प्रश्नाचं उत्तर देत राणीने कोणताच विचार न करता अभिनाता शाहीद कपूर याचं नाव घेतलं. कारण एक काळ असा होता, जेव्हा करीना आणि शाहीद यांच्या नात्याची तुफान चर्चा रंगली होती.

एका मुलाखतीत जेव्हा राणी हिला विचारण्यात आलं की, तुझ्याकडे असं काय आहे, जे करीना हिच्याकडे नाही? याप्रश्नाचं उत्तर देताना राणी विचार करत राहिली आणि करीना म्हणाली, ‘यश चोप्रा…’,य करीनाने दिलेलं उत्तर ऐकून राणी देखील हैराण झाली. जेव्हा राणी आणि करीना दिग्दर्शक करण जोहर याच्या ‘कॉफी विथ करण’ या टॉक शोमध्ये पोहोचल्या होत्या, तेव्हा त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल तुफान चर्चा रंगल्या.

 

सांगायचं झालं तर राणी हिने यश राज प्रॉडक्शनच्या अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. यश राज बॅनर अंतर्गत साकारण्यात आलेल्या, ‘वीर-झारा’, ‘हम-तुम’, ‘बंटी और बबली’, ‘मुझसे दोस्ती करोगे’, ‘साथिया’ आणि ‘लागा चुनरी में दाग’ अशा अनेक सिनेमांमध्ये राणीने काम केलं आहे. राणी कायम तिच्या भूमिकांमुळे चर्चेत राहिली.

यश राज प्रॉडक्शनच्या अनेक सिनेमांमध्ये काम केल्यानंतर राणीने यश चोप्रा यांचे पूत्र आदित्य चोप्रा याच्यासोबत लग्न केलं. आदित्य आणि यश यांना एक मुलगी देखील आहे. राणी आता तिच्या कुटुंबासोबत आनंदी वैवाहिक आयुष्य जगत आहे. शिवाय अनेक कार्यक्रमांमध्ये देखील राणीला स्पॉट करण्यात येतं.