Maharashtra Civic Elections: ‘नोटा’चं बटण तरी महाराष्ट्रात 66 नगरसेवक बिनविरोध का? मनसे कोर्टात जाणार!
महाराष्ट्रातील 29 महापालिकांमध्ये तब्बल 66 नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विरोधकांनी भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेवर 5 ते 10 कोटी देऊन उमेदवारांना माघार घ्यायला लावल्याचा आरोप केला आहे. मनसेने या विरोधात उच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय घेतला असून, नोटा पर्यायाचा मुद्दाही उपस्थित केला आहे.
महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांमधील निवडणुकीत तब्बल 66 नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. या बिनविरोध विजयांवर ठाकरे गटाच्या शिवसेनेने आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) गंभीर आरोप केले आहेत. उमेदवारांना 5 ते 10 कोटी रुपये देऊन अर्ज मागे घ्यायला लावले असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. या 66 बिनविरोध नगरसेवकांमध्ये भाजपचे 43, शिंदे गटाच्या शिवसेनेचे 19, अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 2, इस्लाम पार्टीचा 1 आणि 1 अपक्ष उमेदवाराचा समावेश आहे. मनसेने या प्रकाराला लोकशाहीविरोधी ठरवत मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे.
सोमवारी मनसे उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. निवडणूक आयोगाने नोटाचा (NOTA) पर्याय उपलब्ध करूनही निवडणुका बिनविरोध का केल्या जातात, असा सवालही मनसेने उपस्थित केला आहे. राज्य निवडणूक आयोगाने या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडून सविस्तर अहवाल मागवला असून, उमेदवारांनी माघार का घेतली, याबाबत चौकशी सुरू केली आहे
BMC Election | महानगरपालिका निवडणुकी दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा
Devendra Fadnavis | सरकार अमरावतीच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे
Shambhuraj Desai | शिवसेनेचा भगवा घेतल्याशिवाय सत्ता स्थापन होणं अशक्य
उद्धवमामूंचा महापौर झाला तर...; अमित साटम यांचा ठाकरेंना टोला

