IND vs NZ : कॅप्टन शुबमन गिलनमुळे इशान किशनचा पत्ता कट;बैठकीत काय ठरलं?
Shubman Gill and Ishan kishan : कोणत्याही मालिकेसाठी संघात कोणत्या खेळाडूला संधी द्यायची आणि कुणाला नाही? याबाबतचा अंतिम निर्णय हा कर्णधार आणि निवड समितीच घेते, हे स्पष्ट आहे. आता इशानचं नाव चर्चेत असूनही त्याला एकदिवसीय संघात संधी मिळाली नाही, का? जाणून घ्या.

टीम इंडिया मायदेशात नववर्षात न्यूझीलंड विरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे. उभयसंघात एकूण 3 एकदिवसीय सामने खेळवण्यात येणार आहेत. बीसीसीआय निवड समितीने मालिकेसाठी शनिवारी 3 जानेवारीला भारतीय संघाची घोषणा केली. एकदिवसीय मालिकेतून भारतीय संघात अनेक खेळाडूंचं कमबॅक झालं. मात्र विकेटकीपर बॅट्समन इशान किशन याला संधी मिळाली नाही. इशानचा देशातंर्गत क्रिकेटमधील कामगिरीनंतर आगामी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला. त्यानंतर इशानने तडाखेदार कामगिरी करत एकदिवसीय मालिकेसाठी आपला दावा ठोकला होता. इशानला संधी मिळणार असल्याचं मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं होतं. मात्र बीसीसीआयकडून इशानला संधी देण्यात आली नाही.
निवड समितीकडून इशानला चांगल्या कामगिरीनंतरही संधी देण्यात आली नाही. निवड समितीने पुन्हा एकदा इशानऐवजी ऋषभ पंत याला प्राधान्य देत संघात कायम ठेवलं. निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर आणि कर्णधार शुबमन गिल या दोघांनी इशानऐवजी ऋषभ पंतला प्राधान्य दिलं.
पंत आगरकर-गिलची पहिली पंसत!
रेव्हस्पोर्ट्सझनुसार, बीसीसीआय निवड समितीला पंतला संधी न देताच बाहेर करायचं नव्हतं. निवड समितीच्या या भूमिकेला कर्णधार म्हणून शुबमन गिल यानेही समर्थन दिलं. रिपोर्ट्सनुसार, गिलनेही पंतच्या बाजूने भूमिका मांडली. तसेच गिल आणि निवड समितीचं पंतला केएल राहुलचा बॅकअप ठेवण्याबाबत एकमत झालं.
इशान किशनला टी 20i सीरिजमध्ये संधी?
बीसीसीआयने न्यूझीलंड विरूद्धच्या वनडे सीरिजसाठीच टीम इंडियाची घोषणा केलीय. टीम इंडिया वनडेनंतर न्यूझीलंड विरुद्ध 5 मॅचची टी 20i सीरिज खेळणार आहे. इशानला या मालिकेसाठी संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
इशानबाबत निवड समितीच्या बैठकीत चर्चा झाली. निवड समितीचं इशानच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे. इशानने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेच्या या हंगामाची सुरुवात शतकाने केली होती. इशानने कर्नाटक विरुद्ध शतक ठोकलं होतं. इशान त्यानंतर काही सामने खेळला नाही. इशानने शनिवारी केरळ विरुद्ध कमबॅक करत 21 धावा केल्या.
तसेच इशान आणि शुबमन दोघेही खास मित्र आहेत. त्यानंतरही शुबमनने इशानऐवजी पंतच्या बाजूने बाजू मांडली. इशानला एकदिवसीय मालिकेत संधी न मिळाल्याने चाहते नाराज आहेत. त्यामुळे आता इशानाल टी 20i सीरिजमध्ये मिळणार की नाही? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
