आई-वडिलांवर वादग्रस्त वक्तव्य, जीभ रणवीरची, पण शब्द कोण्या दुसऱ्याचेच, कोण आहे तो?

YouTuber Ranveer Allahbadia: 'त्या' वादग्रस्त प्रश्नामुळे रणवीर वादाच्या भोवऱ्यात, दुसऱ्याची कॉपी केली आणि अडकला अडचणीत, प्रश्न विचारताना जीभ रणवीरची, पण शब्द कोण्या दुसऱ्याचेच, कोण आहे तो?

आई-वडिलांवर वादग्रस्त वक्तव्य, जीभ रणवीरची, पण शब्द कोण्या दुसऱ्याचेच, कोण आहे तो?
| Updated on: Feb 11, 2025 | 12:30 PM

YouTuber रणवीर अलाहाबादिया स्टँड-अप कॉमेडियन समय रैनाच्या इंडियाज गॉट लेटेंट शोमध्ये उपस्थित होता. मात्र, शोमध्ये येणं रणवीर याला महागात पडलं आहे. शोदरम्यान रणवीर याने वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे यूट्यूबरच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. रणवीर याने आई-वडिलांच्या खासगी आयुष्याबद्दल देखील अत्यंत वाईट प्रश्न विचारला, ज्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. पण आता समोर आलेल्या माहितीनुसार, रणवीर याने विचारलेला प्रश्न त्याचा स्वतःचा नव्हता. प्रश्न विचारताना जीभ फक्त रणवीरची होती, प्रश्न मात्र एका आंतरराष्ट्रीय शोमधून कॉपी केला होता.

बीअर बायसेप्स नावाने प्रसिद्ध युट्यूबर रणवीर अलाहबादिया याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. अशात शोमध्ये त्याने विचारलेल्या प्रश्नावर खुद्द समय रैना देखील हैराण झाला. सध्या सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये सर्वत्र फक्त आणि फक्त रणवीर याने विचारलेल्या प्रश्नाची चर्चा रंगली आहे.

आंतरराष्ट्रीय शोमधून कॉपी केलेला प्रश्न

रणवीर याने हा प्रश्न आंतरराष्ट्रीय शो ओजी क्रू के ट्रुथ ऑर ड्रिंक मधील आहे. संबंधित प्रश्न त्यांच्या शोमध्ये देखील नुकताच विचारण्यात आला होता. जो 25 जानेवारी रोजी टेलिकास्ट झाला आहे. हा कॉमेडी शो ऑस्ट्रेलियन कॉमेडियन सॅमी वॉल्श, अकिला, अँड्र्यू, एबी आणि ॲलन यांनी सुरू केला आहे. हा प्रश्न शोमध्ये सॅमी वॉल्शने विचारला होता.

हटवण्यात आलाय व्हिडीओ

व्हिडीओवर NHRC ने देखील आक्षेप घेतला आहे. NHRC ने यूट्यूबला पत्र लिहून, प्लॅटफॉर्मवरून वादग्रस्त व्हिडीओ हटवण्यास सांगितलं. शिवाय तीन दिवसांमध्ये प्रकरणावर स्पष्टीकरण देण्यास सांगितलं आहे. एवढंच नाही तर, असे कटेंट भारतात चालणार नाहीत. वादग्रस्त कटेंट तात्काळ हटवा आणि ज्याने केलं आहे त्याच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करा… आसा NHRC कडून अल्टिमेटम देखील देण्यात आला आहे.

रणवीर अलाहबादियाने मागितली माफी…

सर्वत्र संतापाची लाट असल्यामुळे रणवीर अलाहाबादियाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून आपल्या टिप्पणीबद्दल माफी मागितली आहे. ‘माझी टिप्पणी केवळ अयोग्यच नव्हती, तर मजेदारही नव्हती. कॉमेडी हा माझा पिंड नाही. मी इथे फक्त माफी मागायला आलो आहे.’ असं म्हणत रणवीर याने माफी मागितली.