AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रणवीर अलाहबादियाचं वादग्रस्त वक्तव्य, YouTube चा मोठा निर्णय, 3 दिवसांचा अल्टिमेटम

Ranveer Allahbadia: आई-वडिलांवर केलेल्या वादग्रस्त विधानानंतर रणवीर अलाहबादियाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता, YouTube चा मोठा निर्णय तर 3 दिवसांचा अल्टिमेटम...

रणवीर अलाहबादियाचं वादग्रस्त वक्तव्य, YouTube चा मोठा निर्णय, 3 दिवसांचा अल्टिमेटम
| Updated on: Feb 11, 2025 | 12:19 PM
Share

बीअर बायसेप्स नावाने प्रसिद्ध युट्यूबर रणवीर अलाहबादिया नुकताच समय रैना याच्या कॉमेडी रिअॅलिटी शो इंजियाज गॉट लेटेंटमध्ये पोहोचला होता. येथे रणवीर याने स्पर्धकाला आपत्तीजनक प्रश्न विचारला. ज्यामुळे युट्यूबर आता वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. प्रकरण इतकं टोकाला गेलं आहे की, रणवीर याच्याविरोधत एफआयआर देखील दाखल करण्यात आली आहे. सर्वच स्तरातून विरोध होत असल्याचं लक्षात येताच रणवीर याने सोशल मीडियाच्या माध्यमातून माफी देखील मागितली. पण आता याप्रकरणी युट्यूबने मोठं निर्णय घेतला आहे. युट्यूबने तो वादग्रस्त व्हिडीओ YouTube वरुन हटवला आहे.

व्हिडीओवर NHRC ने देखील आक्षेप घेतला आहे. NHRC ने यूट्यूबला पत्र लिहून, प्लॅटफॉर्मवरून वादग्रस्त व्हिडीओ हटवण्यास सांगितलं. शिवाय तीन दिवसांमध्ये प्रकरणावर स्पष्टीकरण देण्यास सांगितलं आहे. यासोबतच गुवाहाटी पोलिसांनी या प्रकरणी एफआयआरही नोंदवला आहे. NHRC सदस्य प्रियांक कानूनगो यांनी शोमध्ये सहभागी कंटेंट निर्मात्यांना प्राणी म्हटलं आहे.

एवढंच नाही तर, कानूनगो यांनी सामिल युट्यूबर यांना अटक करून मानसिक उपचार द्यावेत… असा सल्ला पोलिसांना दिला आहे. त्या पुढे म्हणाल्या, ‘माणूस आणि प्राणी यांच्यातील फरक म्हणजे विवेक आणि बुद्धी आणि माणसाची विवेकबुद्धी त्याला सभ्यतेकडे आणते. पण जो व्यक्ती आई-वडिलांच्या खासगी आयुष्याबद्दल बोलत असेल तर, ती व्यक्ती प्राणी आहे…’

‘सर्वात मोठं दुर्भाग्य म्हणजे त्या व्यक्तीच्या आई – वडिलांचं, ज्यांच्या मुलगा सर्वाजनिक प्लॅटफॉर्मवर असं वक्तव्य करत आहे. तो विकृत मानसिकतेने त्रस्त आहे. “खरं तर त्याला उपचाराची गरज आहे.’ असं देखील प्रियांक कानूनगो म्हणाले

प्रियांक कानूनगो पुढे म्हणाले, ‘आम्ही युट्यूबला सांगितलं आहे की, असे कटेंट भारतात चालणार नाहीत. असे कटेंट तात्काळ हटवा आणि ज्याने केलं आहे त्याच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करा.. .आम्ही नोटीस बजावली आहे, यावर कारवाई करण्याची जबाबदारी यूट्यूबची आहे, जर त्यांनी कारवाई केली नाही तर आम्ही यूट्यूबवर कारवाई करू.’ असा अल्टिमेटम देखील देण्यात आला आहे.

रणवीर अलाहबादियाने मागितली माफी…

सर्वत्र संतापाची लाट असल्यामुळे समय रैनाच्या शोमध्ये अश्लील प्रश्न विचारणाऱ्या रणवीर अलाहाबादियाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून आपल्या टिप्पणीबद्दल माफी मागितली आहे. ‘माझी टिप्पणी केवळ अयोग्यच नव्हती, तर मजेदारही नव्हती. कॉमेडी हा माझा पिंड नाही. मी इथे फक्त माफी मागायला आलो आहे.’ असं म्हणत रणवीर याने माफी मागितली.

Follow Us
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...