निवडणुकीत उभा राहा…, Live कॉन्सर्टमध्ये कोणावर भडकला सोनू निगम? व्हिडीओ व्हायरल
Sonu Nigam: इकडे काय उभा राहतो निवडणुकीत उभा राहा..., कॉन्सर्टमध्ये कोणावर भडकला सोनू निगम, रागावरील नियंत्रण सुटलं आणि ...., सोनू निगम कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो.

प्रसिद्ध गायक सोनू निगम याचा एका व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये सोनू चाहत्यांवर नाराज झाल्याचं चित्र दिसत आहे. प्रेक्षकांच्या वर्तनामुळे कॉन्सर्टमध्ये गायकाचे रागावरील नियंत्रण सुटलं आणि त्याने प्रेक्षकांमध्ये उपस्थित असणाऱ्या काहींना चांगलेच सुनावले. ‘इकडे का उभा राहतो जा निवडणुकीत उभा राह…’ असे शब्द गायकाने प्रेक्षकांना सुनावले आहेत. हा व्हिडिओ कोलकाता येथील एका कॉन्सर्टचा आहे.
10 फेब्रुवारीला सोनू निगमचा हा नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळाला. जिथे तो हिरव्या रंगाच्या सूटबूटमध्ये दिसत आहे. कॉन्सर्टसाठी तयार सोनू निगमच्या डोळ्यासमोर असं काही आलं ज्यामुळे गायक काही लोकांवर रागावू लागला.
इंन्स्टाग्रामवर व्हिडीओ एका चाहत्याने शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये सोनू निगम म्हणतो, ‘जर तुला उभं राहायचं असेल तर निवडणुकीत उभा राह… कृपा करुन लवकर खाली बसा… माझा वेळ निघून जात आहे, नाहीतर मला कमी गाणी घ्यावी लागतील… लवकर बसा नाहीतर बाहेर जा… जागा खाली करा…’ असं सोनू निगम म्हणाला.
View this post on Instagram
व्हायरल व्हिडीओवर आता नेटकरी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. एक नेटकरी म्हणाला, ‘असं चुकीचं व्यवस्थापन आहे हे अत्यंत चुकीचे आहे. अत्यंत लज्जास्पद आहे.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘असे दिसतंय की सोनू निगम गर्दीचं व्यवस्थापन करत आहे आणि सुरक्षेची काळजी घेत आहे.’, अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘राग सुद्धा इतक्या सुरात…’ सध्या सोशल मीडियावर सोनू निगमचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
सोनू निगम पोहोचला होता राष्ट्रपती भवनात
नुकताच सोनू निगमने राष्ट्रपती भवन दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. त्याने तिथे लाईव्ह परफॉर्म देखील केलं. इंस्टाग्रामवर एका व्हिडीओद्वारे त्याने आपला टूरचा अनुभवही शेअर केला आहे. सोनू निगम कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो.
