AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संसदेत अचानक धाड धाड गोळ्या सुटल्या; भारताचा मित्र देश हादरला, जगभर खळबळ

Philippines Parliament Firing : भारताचा मित्र देशाच्या संसदेत गोळीबार झाल्याची बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सिनेट परिसराच्या जवळ 12 पेक्षा अधिक गोळ्यांचे आवाज ऐकू आले.

संसदेत अचानक धाड धाड गोळ्या सुटल्या; भारताचा मित्र देश हादरला, जगभर खळबळ
philippines parliament firingImage Credit source: tv9 marathi
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: May 13, 2026 | 8:11 PM
Share

Philippines Parliament Firing : भारताचा मित्र देशाच्या संसदेत गोळीबार झाल्याची बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सिनेट परिसराच्या जवळ 12 पेक्षा अधिक गोळ्यांचे आवाज ऐकू आले. संपूर्ण जगात खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. भारताचा मित्र देश असणाऱ्या फिलीपिन्सच्या संसदेत गोळीबार झाला आहे. राजधानी मनीला येथील सिनेट ऑफ फिलिपिन्स भवनात गोळीबाराची घटना समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सिनेट परिसराच्या जवळ 12 पेक्षा अधिक गोळ्यांचे आवाज ऐकू आले. त्यानंतर लोकांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आणि खोल्यांमध्ये लपून बसण्याचे निर्देश देण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण देशासह जगभरात खळबळ उडाली आहे.

सिनेट परिसरात काय घडलं?

फिलिपिन्स सिनेटचे अध्यक्ष ॲलन पीटर कायेटानो यांनी म्हटले की, ‘आमच्यावर हल्ला होत आहे. राष्ट्रीय तपास संस्था (NBI) चे काही अधिकारी सिनेट परिसरात घुसण्याचा प्रयत्न करत होते. इथे गोळीबार सुरू आहे, नेमकं काय घडतंय हे आम्हाला माहिती नाही. सर्वजण आपल्या खोल्यांमध्ये बंद आहेत. तसेच अधिकाऱ्यांना GSIS इमारतीच्या बाजूने भिंतींमध्ये ड्रिलिंग करताना पाहण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

संसद परिसरात जवान तैनात

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, गोळीबार नेमका कोणी केला आणि या घटनेत कोणी जखमी झाले का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेनंतर सुरक्षा दल आणि लष्करी जवानांना सिनेट भवनाबाहेर तैनात करण्यात आले असून, अनेक जवानांच्या हाता शस्त्रे पहायला मिळाली.

गोळीबाराचा हा संपूर्ण प्रकार फिलीपिन्सचे सिनेटर रोनाल्ड डेला रोसा यांना अटक करण्याच्या प्रयत्नांदरम्यान घडल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिमिनल कोर्टाकडून (ICC) मानवतेविरुद्ध गुन्ह्यांचे आरोप ठेवण्यात आले आहेत. माजी राष्ट्राध्यक्ष रोड्रिगो दुतेर्ते यांच्या अमली पदार्थविरोधी मोहिमेदरम्यान झालेल्या कथित हत्यांमध्ये सहभाग असल्याचा आरोप डेला रोसा यांच्यावर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डेला रोसा गेल्या काही दिवसांपासून सिनेट परिसरात आश्रय घेत असल्याची माहिती समोर आली आहे.

Follow Us
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...