AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Milk Rate : दूध महागलं! अमूल दूधचा तातडीचा मोठा निर्णय, आता एक बॅग मिळणार…

मिळालेल्या माहितीनुसार अमूल दूधामध्ये प्रति लीटर दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ही भाववाढ संपूर्ण देशासाठी लागू असेल. येत्या 14 मे रोजीपासून ही भाववाढ लागू होईल. गेल्या काही दिवसांपासून पशूखाद्य महागले आहे.

Milk Rate : दूध महागलं! अमूल दूधचा तातडीचा मोठा निर्णय, आता एक बॅग मिळणार...
amul price increaseImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 13, 2026 | 9:03 PM
Share

Milk Price Increased : इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे संपूर्ण जग होरपळत आहे. भारतात तर इंधनवाढीचा फटका बसत आहे. अशीच स्थिती कायम राहिली तर लवकरच लवकरच पेट्रोल आणि डिझेलचा भाव वाढवावा लागणार आहे. त्याचा फटका सामान्यांना बसणार आहे. भारतात फक्त इंधनच नव्हे तर खाद्यपदार्थ, सोनं महागलं आहे. उद्योग, व्यापार अशा सर्वच क्षेत्रात उत्पादन खर्च वाढला आहे. त्यामुळे अनेक वस्तू महाग होत आहेत. असे असतानाच आता सामान्यांच्या खिशाला आणखी झळ बसणार आहे. कारण अमूल दूधच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही भाववाढ संपूर्ण देशात लागू असणार आहे. तसा निर्णय घेण्यात आला आहे.

दूधाचा भाव किती वाढला?

मिळालेल्या माहितीनुसार अमूल दूधामध्ये प्रति लीटर दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ही भाववाढ संपूर्ण देशासाठी लागू असेल. येत्या 14 मे रोजीपासून ही भाववाढ लागू होईल. गेल्या काही दिवसांपासून पशूखाद्य महागले आहे. त्यामुळे एकंदरित दूध उत्पादनाचा खर्चही वाढला आहे. त्यामुळेच ही भाववाढ करण्यात आली आहे. पशूखाद्य आणि पॅकेजिंगचा खर्च वाढला आहे. त्यामुळे दूधाच्या किमतीत वाढ करावी लागत आहे, असे अमूल कंपनीने सांगितले आहे. शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे.

आता कोणते दूध किती रुपयांना मिळणार?

अमूल गोल्ड (फुल क्रीम) आता 35 (500 मिली) आणि 670 प्रति लिटर दराने उपलब्ध होईल. अमूल ताझा (टोन्ड) दूध 30 (500 मिली) आणि 58 रुपये प्रति लिटर दराने मिळेल. अमूल गाईचे दूध 31 रुपये (500 मिली) दराने विकण्यात येईल. अमूल म्हशीचे दूध 38 दराने उपलब्ध असेल. दरम्यान, शासकीय समिती GCMMF नुसार दूधाचा वाढलेला हा भाव दूधाच्या प्रमुख पॅकेट्सवर लागू असेल. ही भाववाढ प्रती लीटर 2.5 ते 3.5 टक्के आहे. दूधाचे उत्पादन, संकलन, वाहतूक, पॅकेजिंग अशा सर्वच बाबतीत खर्च वाढल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

Follow Us
इकडे उद्धव ठाकरेंचा दौरा तिकडे निंबाळकरांचा मोठा निर्णय; पदाधिकाऱ्यांन
Omraje Nimbalkar | इकडे उद्धव ठाकरेंचा दौरा तिकडे निंबाळकरांचा मोठा डाव; पदाधिकाऱ्यांना...
भाजपमध्ये आतल्याआतच मोठं घडतंय? बड्या नेत्याचं पद जाईल म्हणून...
भाजपमध्ये आतल्याआतच मोठं घडतंय? बड्या नेत्याचं पद जाईल म्हणून... उद्धव ठाकरेंनी सांगितली इनसाईड स्टोरी
इतिहास आहे, इकडचे खासदार काही वर्षांनी.. संजय जाधवांच्या मतदारसंघातील
इतिहास आहे, इकडचे खासदार काही वर्षांनी.. संजय जाधवांच्या मतदारसंघातील दौऱ्यापूर्वीच उद्धव ठाकरेंचे विधान
अजित पवारांच्या आठवणीत सुप्रिया सुळे झाल्या भावूक! शेअर केला तो खास फो
Supriya Sule | अजित पवारांच्या आठवणीत सुप्रिया सुळे झाल्या भावूक! शेअर केला तो खास फोटो
धक्कादायक! आठवड्याभरातच मुंबई लोकलमध्ये तिसरा चाकू हल्ला; माहिममध्ये..
धक्कादायक! आठवड्याभरातच मुंबई लोकलमध्ये तिसरा चाकू हल्ला; माहिममध्ये...
एक-एक टक्का देतो, आधी 40... शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; खळबळ
एक-एक टक्का देतो, आधी 40...  शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; एकच खळबळ
श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुला
Omraje Nimbalkar | श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले....
ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस
Omraje Nimbalakar | ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस... मोठा गोंधळ
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेम
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेमकं काय म्हणाले?
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच पोलिसांना...