आई – वडिलांवर वादग्रस्त वक्तव्य, रणवीर अलाहबादिया वादाच्या भोवऱ्यात, YouTube वरून किती कमावतो?
Ranveer Allahbadia: भारतातील सर्वाधित कमाई करणाऱ्या रणवीरला बसणार मोठा फटका, YouTube वरून किती कमावतो? पण यापुढे..., आई - वडिलांवर वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे रणवीर वादाच्या भोवऱ्यात

प्रसिद्ध यूट्यूबर रणवीर अलाहबादियाने समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमध्ये आई – वडिलांबद्दल आक्षेपार्ह विधान केलं. त्याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर सर्वच क्षेत्रातून टीकेची झोड उठली आहे. सर्वच स्तरातून रणवीर टीका होत आहे. टीका होत असल्याचं लक्षात येताच रणवीर याने माफी मागितली. तरी देखील रणवीर याला ट्रोल करण्यात येत आहे.
‘इंडिया गॉट लेटेंट’ मधील कथित अश्लील आणि वादग्रस्त विधानामुळे रणवीर अलाहबादिया वादात सापडला आहे. वादग्रस्त वक्तव्याचा रणवीरला मोठा फटका बसला आहे. विधानामुळे रणवीरच्या कमाईचं मोठं नुकसान होणार आहे. सांगायचं झालं तर, रणवीर भारतातील सर्वाधित कमाई करणाऱ्या युटयुबर्सपैकी एक आहे.
View this post on Instagram
युटयुबर रणवीर अलाहबादिया याची कमाई
रिपोर्टनुसार, 2024 पर्यंत रणवीर याची संपत्ती 60 कोटी रुपये होती. शिवाया इन्स्टाग्राम आणि इतर माध्यमांमधून रणवीर जवळपास 35 लाख रुपये महिन्याला कमावतो. पण आता त्यांच्या कमाईचा आकडा मंदावणार आहे. कारण कथित अश्लील आणि वादग्रस्त विधानामुळे रणवीर अल्लाबदियाने त्याच्या चॅनलवरील 3 मिलियनहून अधिक युजर्स एका दिवसात गमावले आहेत.
रणवीर अलाहाबादियाच्या बीअर बायसेप्स या युट्यूब चॅनेलचे ३१ जानेवारी 2025 ला 10.5 मिलियन सबस्क्रायबर्स होते. तर आता त्याच्या सबस्क्रायबर्सचा आकडा 8.3 वर पोहोचला आहे. दरम्यान, प्रकरण अधिक चिघळल्यास, त्याचे परिणाम रणवीरच्या कमाईवर पडणार आहे.
View this post on Instagram
घटनेनंतर शोचे काही सदस्य कर्मचारी यांची मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरु असून शोवर कारवाई करण्यात आली आहे. रणवीर आणि समय आणि शोमध्ये उपस्थित असलेल्या सर्व लोकांविरुद्ध प्रथम मुंबईत आणि नंतर दिल्लीत तक्रार दाखल करण्यात आली. आता याप्रकरणी पुढे काय होणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
रणवीर अलाहाबादिया याच्या शोमध्ये अनेक सेलिब्रिटी देखील हजेरी लावत असतात. शिवाय त्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. पण आता आई-वडिलांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे रणवीर अलाहाबादिया अडचणीत अडकला आहे.
