
बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनची लेक राशा थडानीची सध्या तिच्या चित्रपटामुळे चांगलीच चर्चा आहे. आझाद चित्रपटातील तिच्या अभिनयाचं कौतुकही होत आहे. चित्रपटाच्या निमित्ताने अनेक मुलाखतही दिल्या आहेत. त्या दरम्यान तिने तिच्या आईबद्दल म्हणजे रविनाबद्दल बरेच किस्से सांगितले आहे.
राशा थडानीची बॉलिवूड एन्ट्री
राशा थडानीने जानेवारी 2025 मध्ये बॉलिवूडमध्ये प्रवेश केला आहे. राशाचा पहिला चित्रपट आझाद प्रदर्शित झाला असून तिला तिच्या कामासाठी खूप पसंती मिळाली आहे. राशाच्या सौंदर्याचेही खूप कौतुक केले जाते. अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान राशाने खुलासा केला होता की ती लहानपणी खूप खोडकर होती, त्यामुळे तिला आईकडून खूप मारही मिळायचा.
एका मुलाखतीदरम्यान राशा थडानीने तिची आई रवीना टंडनसोबतच्या तिच्या नात्याबद्दल अनेक खुलासे केले तसेच अनेक किस्सेही सांगितले. यादरम्यान तिने आपल्या आईला आपली सर्वात चांगली मैत्रीण असल्याचंही म्हटलं आहे.
राशाला लहानपणी तिच्या आईकडून मार का खाल्ला?
राशा म्हणाली, “जेव्हा मी चुकीच्या मार्गावर जाते किंवा काही चूक करते तेव्हा आई मला सुधारते. तिने मला नेहमीच प्रत्येक बाबतीत साथ दिली आहे.”, राशाने सांगितले की तिची आई लहानपणी खूप कडक होती, पण जेव्हा ती 14 वर्षांची झाली तेव्हा तिची आई फार बदलली, कूल मॉम झाल्याचं ती सांगते.
राशाने तिच्या बालपणाशी संबंधित एक मजेदार किस्साही शेअर केला आहे. अभिनेत्री म्हणाली, “मी वयाच्या 14 व्या वर्षी सर्व काही शिकले होते, कारण मी शिकले नसते तर माझ्या आईकडून मला खूप फटकारले असते. माझ्या लहानपणी मला अनेक वेळा आईकडून मार मिळाला आहे. मी जेव्हा नखे चावत असे तेव्हा माझी आई मला खूप ओरडायची आणि हातावर चापट मारायची. ती म्हणायची थांब, असं करू नकोस. अशा अनेक सवयी होत्या ज्यासाठी मला तिने थांबवले आहे” असं म्हणत तिने आई रविनाविषयी सांगितलेय.
राशा तिच्या आईशी मुलांबद्दल किंवा तिच्या मित्रांबद्दल मोकळेपणाने बोलते
राशाने पुढे सांगितले की, “मी लहानपणी खूप खोडकर होते. मी घरी एवढी मस्ती करायचे की माझ्या आई-वडिलांना खूप हैराण केलं आहे. जर आई मला म्हणाली की असं करू नको , त्यावेळी मी ठीक आहे म्हणायचे आणि काही वेळाने मी पुन्हा तेच करायचे. त्यामुळे आई-वडिलांना मी फार त्रास दिला आहे” असे अनेक किस्से राशाने सांगितले. दरम्यान राशाचे तिची आई म्हणजे रवीनासोबत खूप चांगले बॉंड असून आई म्हणजे घट्ट मैत्रिण असल्याचंही राशाने अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे.