रश्मिका मंदाना विमान अपघातात मरता मरता वाचली, समोर आलेला फोटो धक्कादायक

Rashmika Mandanna : काळ आला होता पण वेळ आली नव्हती.... नशीब बलवत्तर म्हणून वाचले रश्मिका मंदाना हिचे प्राण... विमान अपघाता गमावले असते रश्मिका मंदाना हिने स्वतःचे प्राण...

रश्मिका मंदाना विमान अपघातात मरता मरता वाचली, समोर आलेला फोटो धक्कादायक
| Updated on: Feb 18, 2024 | 12:31 PM

Rashmika Mandanna : फक्त साउथ सिनेविश्वातील नाही तर, बॉलिवूडमध्ये देखील स्वतःचं भक्कम स्थान निर्माण करणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना हिचं नशीब बलवत्तर म्हणून प्राण वाचले आहे. रश्मिका मंदाना हिचा काळा आला होता पण वेळ आली नव्हती असं म्हणायला हरकत नाही. कारण अभिनेत्री ज्या विमानातून प्रवास करत होती. त्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली आहे. खुद्द अभिनेत्रीने घटलेल्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. अभिनेत्रीची पोस्ट पाहिल्यानंतर चाहत्यांनी देखील चिंता व्यक्त केली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रश्मिका हिच्या सोशल मीडियावर पोस्टची चर्चा सुरु आहे.

रश्मिका हिने अभिनेत्री श्रद्धा दास हिच्यासोबत इंस्टाग्राम स्टोरीजवर एक फोटो पोस्ट केला आहे. फोटो पोस्ट करत अभिनेत्री म्हणाली, ‘फक्त तुमच्या माहितीसाठी सांगत आहोत, अशा प्रकारे आम्ही आज मरता – मरता वाचलो आहोत…’ फोटोमध्ये रश्मिका आणि श्रद्धा यांचे फोटो दिसत आहेत.

रिपोर्ट्सनुसार, रश्मिका, श्रद्धा यांच्यासोबत अन्य प्रवासी जे विमानातून प्रवास करत होते त्यांच्यासाठी घडलेली घटना फार भयानक होती. काही तांत्रिक बिघाडामुळे विमानाची इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याची माहिती सध्या समोर येत आहे. विमान मुंबईहून हैदराबाद याठिकाणी जात होता.

तांत्रिक बिघाडामुळे मुंबईहून निघालेल्या विमानाचे 30 मिनिटांनी पुन्हा मुंबईत इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. या घटनेत प्रवाशांची कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही. पण विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्यामुळे चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला.

सांगायचं झालं तर, नुकताच बॉक्स ऑफिसवर हीट ठरलेल्या ‘ॲनिमल’ सिनेमामुळे रश्मिका प्रसिद्धी झोतात आली होती. सिनेमात रश्मिका हिने अभिनेता रणबीर कपूर याच्या पत्नी गीतांजली हिची भूमिका साकारली होती. रश्मिका मंदाना हिला आज कोणत्या ओळखीची गरज नाही. अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत असते.