‘देवो के देव महादेव’ फेम पार्वती अडकणार विवाहबंधनात, कोण आहे अभिनेत्रीचा होणारा पती?
Devon Ke Dev Mahadev : 'देवो के देव महादेव' फेम पार्वती हिच्या डोक्यावर पडणार अक्षदा, अभिनेत्री लवकरच अडकणार विवाहबंधनात, कोणासोबत अभिनेत्री घेणार 'सप्तपदी'? सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या लग्नाची चर्चा

मुंबई | 18 फेब्रुवारी 2024 : सध्या बॉलिवूडमध्ये लग्नाचे वारे वाहत आहेत. रकुल प्रीत सिंग-जॅकी भगनानी आणि सुरभी चंदना-करण शर्मा यांच्यासोबत ‘देवो के देव महादेव’ मालिकेत पार्वती या भूमिकेला न्याय देणारी अभिनेत्री सोनारिका भदौरिया देखील लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. सोनारिका हिने साकारलेल्या पार्वती या भूमिकेला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. आता ‘देवो के देव महादेव’ फेम सोनारिका नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे. सोनारिका लवकरच लग्न करणार आहे. सध्या सर्वत्र फक्त सोनारिका हिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.
सोनारिका बॉयफ्रेंड विकास पाराशर याच्यासोबत लग्न करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार गेल्या अनेक दिवसांपासून सोनारिका आणि विकास एकमेकांना डेट करत आहे. जवळपास दीड वर्ष एकत्र राहिल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. रिपोर्टनुसार, विकास रियल इस्टेटमधील प्रसिद्ध ब्रोकर आहे.
कधी आहे सोनारिका आणि विकास यांचं लग्न?
सोनारिका आणि विकास यांचं लग्न 18 फेब्रुवारी रोज राजस्थान येथील सवाई माधोपूर येथे होणार आहे. लग्नानंतर फरीदाबाद याठिकाणी भव्य रिसेप्शन सोहळा पार पडणार आहे. सांगायचं झालं तर, विकास याचं कुटुंब फरीदाबाद येथील आहे. एवढंच नाही तर, मुंबईत देखील विकास याचं आलिशान घर आहे.
View this post on Instagram
2022 मध्ये झालेल्या एका मुलाखतीत खुद्द सोनारिका हिने विकास याच्यासोबत असलेल्या नात्याची कबुली दिली होती. विकास याने सोनारिका हिला मालदीव येथे प्रपोज केला होता. त्यानंतर दोघांचा रोका (साखरपुड्या आधी होणारी विधी) संपन्न झाला. अखेर आता दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं आहे.
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनारिका हिची चर्चा रंगली आहे. सोनारिका हिच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने ‘देवों के देव महादेव’ मालिके शिवाय अनेक तामिळ आणि तेलूगू सिनेमांमध्ये काम केलं आहे. ‘इश्क में मरजावां’, ‘तुम देना साथ मेरा’, ‘दास्तान-ए-मोहब्बत सलीम अनारकली’ यांसारख्या मालिकांमध्ये देखील सोनारिका हिने महत्त्वाची भूमिका साकारली आहे.
सोनारिका सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि केमेंटचा वर्षाव करत असतात. सध्या सोनारिका तिच्या लग्नामुळे चर्चेत आली आहे.
