AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुप्रिम कोर्टाच्या आदेशावर भडकली रवीना टंडन; म्हणाली, स्थानिक संस्थांनी काम…

Raveena Tandon On Supreme Court: स्थानिक संस्थांनी काम..., सुप्रिम कोर्टाच्या 'त्या' आदेशावर रवीना टंडनचं मोठं वक्यव्य, संतापली अभिनेत्री, सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या वक्तव्याची चर्चा...

सुप्रिम कोर्टाच्या आदेशावर भडकली रवीना टंडन; म्हणाली, स्थानिक संस्थांनी काम...
| Updated on: Aug 12, 2025 | 8:39 AM
Share

Raveena Tandon On Supreme Court: सुप्रिम कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर अभिनेत्री रवीना टंडन हिने संताप व्यक्त केला आहे. दिल्लीतील भटक्या कुत्र्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. न्यायालयाने आठ आठवड्यांपेक्षा कमी वयाच्या सर्व भटक्या कुत्र्यांना पकडून शेल्टर होममध्ये ठेवण्याचे आदेश दिले आहेत. भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्यांनंतर सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर प्राण्यांवर प्रेम करणारे लोक मत मांडत आहेत. आता बॉलिवूड स्टार रवीना टंडन हिने देखील या प्रकरणावर स्वतःचं मत मांडलं आहे.

काय म्हणाली रवीना टंडन?

अभिनेत्री रवीना टंडन प्राण्यांवर प्रचंड प्रेम करते. कोर्टाच्या निर्णयानंतर अभिनेत्रीने संताप व्यक्त केला आहे. अभिनेत्री म्हणाली, ‘भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत आहे, त्यामुळे या कुत्र्यांना दोषी ठरवणं योग्य नाही. जर स्थानिक संस्थांनी लसीकरण आणि नसबंदी मोहिमा योग्यरित्या राबवल्या असत्या तर ही परिस्थिती उद्भवलीच नसती. स्थानिक संस्थांना त्यांच्या क्षेत्रातील भटक्या कुत्र्यांची जबाबदारी घ्यावी लागेल. नसबंदी ही आजची सर्वात मोठी गरज आहे.’ असं अभिनेत्री म्हणाली.

कुत्र्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिला आदेश

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश जे.बी. पारडीवाला आणि आर. महादेवन यांच्या खंडपीठाने आदेश दिला की, भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांना नियुक्त केलेल्या शेल्डर होममध्ये ठेवण्यात कोणत्याही व्यक्ती किंवा संघटनेला अडथळा निर्माण करण्याची परवानगी दिली जाणार नाही. जर कोणी असं केलं तर त्यांच्याविरुद्ध अवमानाची कारवाई सुरू केली जाईल. दिल्लीतील भटक्या कुत्र्यांची तक्रार करण्यासाठी हेल्पलाइन नंबर जारी करण्याचे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. तक्रार आल्यानंतर कुत्र्याला पकडलं पाहिजं… असं देखील कोर्टाने सांगितलं आहे.

रवीना टंडन हिचे सिनेमे

सांगायचं झालं तर, रवीना टंडन लवकरच ‘वेलकम टू द जंगल’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात अक्षय कुमार, सुनील शेट्टी, जॅकलीन फर्नांडीज, दिशा पाटनी, लारा दत्ता, संजय दत्त यांसारखे सेलिब्रिटी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. सिनेमा यावर्षी ख्रिसमसला प्रदर्शित होणार होता, परंतु त्याबद्दल कोणतीही अपडेट अद्याप समोर नाही. रवीना आणि अक्षय यांना पुन्हा मोठ्या पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.