
Raveena Tandon Son: अभिनेत्री रवीना टंडन हिला आता कोणत्या ओळखीची गरज नाही. अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. एक काळ असा होता जेव्हा रवीना हिच्या सौंदर्याची आणि अभिनयाची सर्वत्र चर्चा रंगली होती. आता अभिनेत्री मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. रवीना हिच्याप्रमाणे लेक राशा थडानी हिने देखील मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं आहे. राशा हिने ‘आझाद’ सिनेमातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं. सिनेमातील ‘उई अम्मा’ गाण्यामुळे राशा हिच्या लोकप्रियतेत अधिक वाढ झाली.
आज राशा हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. तर अभिनेत्री मुलगा रणबीर याच्या देखील डेब्यूच्या प्रतीक्षेत चाहते आहे. रणबीर झगमगत्या विश्वापासून कायम दूर राहण्याचा प्रयत्न करत असतो. पण त्याच्या पर्सनॅलीटी समोर अनेक प्रसिद्ध स्टारकिड्स देखील फेल आहेत. रवीनाचा लेक रणबीर आता 17 वर्षांचा झाला आहे. शिवाया त्याचा लूक देखील पूर्णपणे बदलला आहे. सध्या त्याचा रणबीरचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
रणबीर आता फक्त 17 वर्षांचा आहे. इतक्या कमी वयात देखील एखाद्या हिरोसारखी त्याची पर्सनॅलिटी आहे. रणबीर आई रवीनापेक्षा देखील उंच दिसतो. सध्या रणबीर याचा कुटुंबासोबत फोटो तुफान व्हायरल होत आहे. राशानंतर रणबीर याच्या बॉलिवूड पदार्पणाच्या प्रतीक्षेत चाहते आहे. अनेकांनी तर रणबीर याला बॉलिवूडचा पुढचा सुपरस्टार म्हणून देखील घोषित केलं आहे.
रवीना हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री अनिल थडानी यांच्यासोबत लग्न केलं आहे. अनिल थडानी एक फिल्म डिस्ट्रीब्यूटर आहेत. रवीना आणि अनिल यांचं लग्न 2004 मध्ये मोठ्या थाटामाटत झालं. रवीना ही अनिल थडानी यांची दुसरी पत्नी आहे.
अनिल थडानी यांच्यासोबत लग्न करण्यापूर्वी अभिनेत्रीनेच्या नावाच्या चर्चा अक्षय कुमार, अजय देवगन यांसारख्या सेलिब्रिटींसोबत रंगल्या. पण नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. रवीना हिने देखील स्वतःच्या रिलेशनशिपचा स्वीकार सर्वांसमोर केला आहे. पण आता अभिनेत्री पती अनिल थडानी यांच्यासोबत आनंदी आयुष्य जगत आहे.