‘इतकी गरिबी पाहिली की…’, आजही 7 स्टार हॉटेलमध्ये हा अभिनेता खातो खिचडी, नाव ऐकून…

इतकी गरिबी पाहिली की आजही हा अभिनेता 7 स्टार हॉटेलमध्ये गेल्यावर महागडे अन्न न मागवता फक्त खिचडी मागवतो. नाव ऐकूनच तुम्हाला बसेल धक्का. कोण आहे तो अभिनेता?

इतकी गरिबी पाहिली की…, आजही 7 स्टार हॉटेलमध्ये हा अभिनेता खातो खिचडी, नाव ऐकून...
Image Credit source: Social media
| Updated on: Aug 01, 2026 | 4:54 PM

भोजपुरी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता तसेच भाजपचे खासदार रवि किशन हे त्यांच्या अभिनयाइतकेच स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखले जातात. विविध सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर ते सातत्याने आपले मत मांडत असतात. काही दिवसांपूर्वी NEET पेपर लीक प्रकरणावरील त्यांच्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर अनेक मीम्स व्हायरल झाल्या होत्या. आता पुन्हा एकदा रवि किशन चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी आपल्या बालपणीच्या गरिबीबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली असून अनेकांनी त्यांची खिल्ली उडवली आहे.

पत्रकार शुभांकर मिश्रा यांना दिलेल्या मुलाखतीत रवि किशन यांनी आपल्या संघर्षमय आयुष्याच्या आठवणी सांगितल्या. बालपणी अत्यंत कठीण परिस्थितीत दिवस काढल्याचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, त्या काळातील गरिबीचा प्रभाव आजही त्यांच्या मनावर कायम आहे.

ते म्हणाले, ‘मी इतकी गरिबी पाहिली आहे की आजही जेव्हा 7 स्टार हॉटेलमध्ये राहतो, तेव्हा महागडे जेवण मागवण्याची हिंमत होत नाही. प्रॉडक्शनच्या खर्चावर असो किंवा माझ्या स्वतःच्या पैशांनी, मी अजूनही साधेच जेवण मागवतो.’

‘आजही खिचडीच ऑर्डर करतो’

रवि किशन यांनी पुढे सांगितले की, ते आजही आलिशान हॉटेलमध्ये गेल्यावर खिचडीसारखे साधे अन्नच मागवतात. ‘मी अजूनही खिचडीच ऑर्डर करतो’. हॉटेलच्या लॉन्ड्रीमध्ये कपडे धुण्यासाठी देतानाही संकोच वाटतो. मनात विचार येतो की हे कपडे घरी जाऊन धुतले तरी चालतील. ती गरिबी आजही माझ्या मनात बसलेली आहे’ असे त्यांनी सांगितले.

रवि किशन यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. मात्र अनेक नेटकऱ्यांनी त्यांच्या विधानावर सहानुभूती व्यक्त करण्याऐवजी त्यांची खिल्ली उडवली. एका चाहत्याने म्हटले की, मलाही अशीच गरिबी हवी, जिथे 7 स्टार हॉटेलमध्ये राहायला मिळतं. दुसऱ्याने लिहिले, ही कसली गरिबी आहे? तर आणखी एका नेटकऱ्याने उपरोधिक प्रतिक्रिया देत म्हटले, अशी गरिबी देवाने सगळ्यांनाच द्यावी.

अभिनयासोबत राजकारणातही सक्रिय

रवि किशन यांनी भोजपुरी चित्रपटसृष्टीसोबतच हिंदी सिनेमातही आपल्या अभिनयाची वेगळी छाप पाडली आहे. अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी विविध भूमिका साकारल्या आहेत. अभिनयासोबतच ते राजकारणातही सक्रिय असून भाजपचे खासदार म्हणून कार्यरत आहेत. रिपोर्टनुसार, रवि किशन हे कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us