या मराठी अभिनेत्रीला पाहून श्रीदेवीला यायचा प्रचंड राग; चित्रपटातून अभिनेत्रीचे सीन कट केले
एका मराठमोळ्या अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं. या अभिनेत्रीचा दमदार अभिनय पाहून श्रीदेवीला देखील मत्सर वाटू लागला होता. जेव्हा कधी श्रीदेवी त्या अभिनेत्रीला पाहयची तेव्हा तिला प्रचंड राग यायचा.

रंगमंचापासून चित्रपटांपर्यंतचा प्रवास प्रत्येकाला जमेलच असं नाही. यासाठी अविरत मेहनत, प्रत्येक भूमिकेत स्वतःला सहजपणे झोकून देण्याची कला आणि थोडंसं नशीबही लागतं. अशीच एक अभिनेत्री होती ज्यांनी बॉलीवुडमधील सर्वात प्रिय ‘आई’ म्हणून आपली ओळख निर्माण केली होती. ही एक मराठमोळी अभिनेत्री असून त्यांनी बॉलिवूडमध्ये आपली अशी एक खास ओळख निर्माण केली होती. या अभिनेत्रीचा अभिनय इतका दमदार होता की चक्क श्रीदेवीलाही तिचा मत्सर वाटू लागला होता.
अनेक कलाकारांसोबत काम केलं
या अभिनेत्री म्हणजे रीमा लागू. त्यांच्या आईकडून प्रेरणा घेत रीमा यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. शाळेत असताना त्या अनेक नाटकांमध्ये सहभागी होत असत. अनेक कलाकारांच्या ‘आई’ बनल्या रीमा लागू. त्यांचा यांचा जन्म 21 जून 1958 रोजी मुंबईत झाला. त्यांनी बालकलाकार म्हणून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. पण खरी लोकप्रियता त्यांना ‘आई’च्या भूमिकांमुळे मिळाली. कमी वयातच त्यांनी आपल्या वयाच्या किंवा त्यांच्यापेक्षा मोठ्या कलाकारांच्या आईच्या भूमिका साकारल्या. त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात 1964 मध्ये प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपट ‘मास्तरजी’ मधून केली.
जूही चावलाच्या आईच्या भूमिकेतून पदार्पण
रीमा यांनी 1988 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटात जूही चावला यांच्या आईची भूमिका प्रथम साकारली. त्यानंतर 1989 मध्ये ‘मैंने प्यार किया’ आणि 1991 मध्ये ‘साजन’या चित्रपटांमध्ये त्यांनी सलमान खान यांच्या आईची भूमिका साकारली. या चित्रपटांनी त्यांना इंडस्ट्रीत ओळख मिळवून दिली आणि त्या कोणत्याही कलाकाराच्या आईची भूमिका उत्तमरित्या साकारू शकतात, हे त्यांनी सिद्ध केलं.
श्रीदेवीच्या आईची भूमिका
हळूहळू प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण करणाऱ्या रीमा यांना 1993 मध्ये श्रीदेवी आणि संजय दत्त यांच्या ‘गुमराह’या चित्रपटासाठी निवडण्यात आलं. या चित्रपटात त्यांना श्रीदेवीच्या आईची भूमिका साकारायची होती. हा चित्रपट दिग्दर्शक महेश भट्ट यांनी दिग्दर्शित केला होता. तर यश जोहर यांनी त्याची निर्मिती केली होती. चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं आणि संपादनाचं काम सुरू झालं.
श्रीदेवी अभिनेत्रिच्या अभिनयामुळे अस्वस्थ
‘गुमराह’ चित्रपटात रीमा लागू यांच्यासोबत काम करताना श्रीदेवी यांना त्यांच्या अभिनयाची खूपच भीती वाटली. असं सांगितलं जातं की, चित्रपटाच्या प्रदर्शनामुळे रीमा यांचा अभिनय पाहून श्रीदेवी अस्वस्थ झाल्या. त्यांना वाटलं की रीमा यांचा दमदार अभिनय त्यांच्या भूमिकेला फिका पाडू शकतो. त्यामुळे त्यांनी तात्काळ महेश भट्ट आणि यश जोहर यांच्याकडे रीमा यांचं रोल कमी करण्याची मागणी केली. मात्र, यश जोहर यांना असं करणं मुळीच आवडलं नव्हतं.
यश जोहर यांनी अशी दूर केली आपली खंत
यश जोहर यांनी श्रीदेवी यांच्या मागणीला मान देऊन रीमा यांच्या भूमिकेवर कात्री लावली खरी, पण त्यांना या गोष्टीचं आतून खूप वाईट वाटत होतं. आपल्या या निर्णयाबद्दल त्यांना पश्चात्ताप झाला. म्हणूनच त्यांनी ही खंत दूर करण्यासाठी एक मार्ग शोधला आणि रीमा लागू यांच्यासोबत एक सुंदर वचन दिलं.की यानंतर जेव्हा कधी ते चित्रपट काढतील तेव्हा त्यांच्या चित्रपटात रीमा लागूया लीड रोडमध्ये असतील.
