
Rekha Personal Life: हिंदी सिनेविश्वातील एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा आज मोठ्या पडद्यावर सक्रिय नसल्या तरी इव्हेंट, पुरस्का सोहळा नाही तर रिऍलिटी शोमध्ये दिसतात. वयाच्या 70 व्या वर्षी देखील रेखा यांच्या सौंदर्यावर चाहते फिदा आहेत. रेखा यांनी अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण खासगी आयुष्यात मात्र त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. रेखा यांनी आयुष्यात प्रेम केलं, लग्न केलं पण कधी आई होऊ शकल्या नाहीत. दिवंगत पती मुकेश अग्रवाल यांनी रेखा यांना बॉलिवूड सोडण्यासाठी सांगितलं होतं. तेव्हा रेखा म्हणाल्या होत्या, ‘प्रेग्नेंट राहिल्यानंतर अभिनय सोडेल…’ पण असं त्यांच्या आयुष्यात कधी झालंच नाही.
सिमी गरेवाल यांना दिलेल्या मुलाखतीत रेखा यांनी त्यांच्या आयुष्याबद्दल धक्कादायक खुलासे केले. 1980 मध्ये मुकेश आणि रेखा यांनी कुटुंबियांच्या सहमतीने लग्न तर केलं, पण त्यांच्या नात्यात प्रेम नव्हतं. लग्नाआधी रेखा आणि मुकेश फक्त एकदा भेटले होते. मुकेश यांच्यासोबत लग्न करणं सर्वात मोठी रिस्क होती… असं देखील रेखा मुलाखतीत म्हणाल्या होत्या.
मुकेश अग्रवाल यांचं निधन झाल्यानंतर रेखा यांना मोठा धक्का बसला होता. पतीच्या निधनाचं सत्य स्वीकारण्यास रेखा तयारच नव्हत्या. असं माझ्यासोबतच का होत आहे? अशा अनेक विचारांनी रेखा यांना घेरलं होतं. एवढंच नाही तर, रेखा यांनी धक्कादायक खुलासा केलेले. हनीमूनच्या वेळी रेखा यांना कळलं होतं की, त्यांचं नातं फार काळ टिकणार नाही. ‘रेखा – द अनटोल्ड स्टोरी’ पुस्तकात देखील याबद्दल लिहिलं आहे. रेखा यांच्या म्हणण्यानुसार, लग्नानंतर मुकेश आणि रेखा हनीमूनसाठी गेले होते. तेव्हाच रेखा यांना कळलं होतं की लग्न फार काळ टिकणार नाही. पण तरी देखील रेखा यांनी नातं टिकवण्याचा प्रयत्न केला.
रेखा यांनी सिनेमात काम केलेलं मुकेश यांना आवडत नव्हतं. रेखा यांनी अभिनय सोडावा… अशी मुकेश यांची इच्छा होती. यावर रेखा म्हणाल्या, ‘प्रेग्नेंट राहिल्यानंतर बॉलिवूड सोडेल..’ पण असं कधी झालंच नाही. त्याआधीच मुकेश यांनी आत्महत्या केली. रेखा सिनेमांच्या शुटिंगसाठी अनेक दिवस घरापासून दूर असायच्या. ते देखील रेखा यांना आवडत नव्हतं… असं देखील रेखा पुस्तकात म्हणाल्या आहेत.