
बॉलिवूडच्या सदाबहार अभिनेत्री म्हणजे रेखा. आज 10 ऑक्टोबर रोजी 71 वा वाढदिवस आहे. पण आजही त्यांच्या सौंदऱ्याने त्या सर्वांना आश्चर्यचकित करतात. रेखा यांनी वयाच्या 16 व्या वर्षी चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. तसेच रेखा यांचे पडद्यावरील आयुष्य जेवढं छान राहीलं आहे तेवढंच त्यांचं वैयक्तिक आयु्ष्य संघर्षाचं राहिलं आहे.त्या सुपरहीट अभिनेत्रींपैकी एक आहेत पण आजही त्या एकटं आयुष्य जगत आहेत. त्यांच्या वैवाहिक आयुष्याबद्दल फार कमी जणांना माहित आहे.
रेखा यांचे किती लग्न झाली ? पहिला पती कोण?
दरम्यान रेखा यांची दोन लग्न झाल्याचं म्हटलं जातं. होय, असं म्हटलं जातं की रेखा यांचे पहिले लग्न बॉलिवूड अभिनेते विनोद मेहरा यांच्याशी झाले होते होते. यासर उस्मान यांनी लिहिलेल्या रेखा ‘द अनटोल्ड स्टोरी’ या त्यांच्या चरित्रात असा उल्लेख आहे की विनोद मेहरा आणि रेखा यांनी कोलकाता येथे गुपचूप लग्न केले होते. लग्नानंतर, जेव्हा अभिनेता रेखा यांना घरी घेऊन आले तेव्हा त्यांची आई संतापली. त्यांच्या आईला रेखा अजिबात आवड नव्हत्या असं म्हटलं जातं. हा वाद पाहता नंतर विनोद मेहरा यांनी रेखा यांना घर सोडण्यास सांगितले असं काही रिपोर्टनुसार सांगण्यात येते.
रेखा आणि अमिताभ यांच्या नात्याचं काय झालं?
त्यानंतर रेखा आणि अमिताभ यांची जोडी हीट होऊ लागली पडद्यावरही आणि खऱ्या आयुष्यातही. रेखा शुटींगदरम्यान अमिताभ यांच्या प्रेमात पडल्या. अमिताभही रेखावर प्रेम करत होते. त्यांच्या अफेअरच्या चर्चा आजही होतात. पण अमिताभ आधीच विवाहित असल्यामुळे ते रेखाला स्वीकारू शकत नव्हते. त्यामुळे त्यांचे नाते तिथेच संपुष्टात आले. तेव्हापासून आजपर्यंत दोघांनीही कधीही त्यावर भाष्य केले नाही.
रेखा यांनी दुसरं लग्न केलं, पण दुसऱ्या पतीने आत्महत्या का केली?
अमिताभ बच्चन यांच्यासोबतचे नाते संपल्यानंतर रेखा यांनी 1990 मध्ये उद्योगपती मुकेश अग्रवाल यांच्याशी दुसरे लग्न मुकेश हॉटलाइन किचनवेअर ब्रँडचे ते मालक होते. तथापि, त्यांचे नातेही फार काळ टिकले नाही. लग्नाच्या काही महिन्यांनंतरच मुकेश यांनी रेखा यांच्या ओढणीनेच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं म्हटलं जातं. त्यानंतर रेखा यांनी पुन्हा कधीच लग्नाचा विचार केला नाही. पण त्यांची नावं पुढेही अनेक अभिनेत्यांसोबत जोडली गेली होती.
आजही मुंबईत 100 करोडचा आलिशान बंगल्यात एकटं आयुष्य
दरम्यान रेखा आजही एकटंच आयुष्य जगत आहेत. रेखा यांचा मुंबईत 100 करोडचा आलिशान बंगला आहे. रेखा यांचा बांद्रा येथील बँडस्टँड येथे आलिशान बंगला आहे. अभिनेत्रीने या बंगल्याचे नाव बसेरा ठेवले आहे. हा बंगला त्याच्या डिझाइन आणि शाही लूकसाठी सातत्याने चर्चेत असते. वृत्तानुसार, रेखाच्या अगदी जवळचे लोकच या घरात प्रवेश करू शकतात. कोणालाही त्यांच्या घरात येण्याची सहजपणे परवानगी मिळत नाही.