या पाकिस्तानी क्रिकेटरशी लग्न करणार होती रेखा? आईने पत्रिका पाहिली अन्… नेमकं काय झालं?

बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध आणि सुंदर अभिनेत्री रेखा एकेकाळी पाकिस्तानी क्रिकेटपटूशी लग्न करणार होती. पण आईने त्यांची पत्रिका पाहिली अन्... नेमकं काय झालं होतं चला जाणून घेऊया...

या पाकिस्तानी क्रिकेटरशी लग्न करणार होती रेखा? आईने पत्रिका पाहिली अन्... नेमकं काय झालं?
Rekha
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Dec 06, 2025 | 6:31 PM

बॉलिवूड आणि क्रिकेट यांचे नाते फार जुने आहे. अनेक क्रिकेटपटूंनी बॉलिवूड अभिनेत्रींना पटवले असून त्यांच्याशी लग्न केले. बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री रेखा देखील एकेकाळी पाकिस्तानी क्रिकेटपटूच्या प्रेमात होती. तिने या क्रिकेटपटूशी लग्न करण्याचा देखील निर्णय घेतला होता. पण रेखाच्या आईने पत्रिका पाहिली आणि लग्न मोडले. आता हा क्रिकेटपटू नेमका कोण होता? रेखाचं या क्रिकेटपटूसोबत अफेअर सुरु होतं का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

एकेकाळी रेखा ही पाकिस्तानचा हँडसम क्रिकेटपटू आणि माजी पंतप्रधान इमरान खान यांच्या प्रेमात होती. इमरान अहमद खान नियाझी, म्हणजे इमरान खान, हे पाकिस्तानचे प्रसिद्ध क्रिकेटर होते. ऑगस्ट 2018 ते एप्रिल 2022 पर्यंत इमरान पाकिस्तानचे 22वे पंतप्रधानही होते. सध्या ते पाकिस्तानमधील अडियाल तुरुंगात आहेत. तुरुंगात त्यांची हत्या झाल्याच्या अफवांमुळे ते चर्चेत आले पण या सर्व अफवा असल्याचे समोर आले आहे. इमरान यांची बहिण जाऊन त्यांना 20 मिनिटे भेटली.

राजकीय नेते असण्याबरोबरच इमरान खान हा पाकिस्तानचा सर्वात प्रसिद्ध क्रिकेटर होता. तो जगातील सर्वात हँडसम, आकर्षक क्रिकेटरमध्ये गणला जात होता. त्यामुळे इमरानच्या वैयक्तिक जीवन आणि लिंक-अप्सच्या कायमच चर्चा रंगल्या होत्या. त्याचे नाव बॉलिवूडच्या अनेक प्रमुख अभिनेत्रींशी जोडले गेले, ज्यात झिनत अमान, शबाना आझमी आणि इतर काही अभिनेत्रींचा समावेश होता. पण सर्वाधिक चर्चा झाली ती दिग्गज अभिनेत्री रेखाची.

रेखा आणि इमरानचे प्रेमप्रकरण

1980 च्या दशकात रेखा आणि इमरानच्या लिंक-अपच्या अफवा सुरू झाल्या होत्या. दोघांना अनेक वेळा एकत्र पाहिले गेले होते. त्यांची प्रेमकथा ग्लॅमर आणि क्रिकेट विश्वात खूप चर्चेचा विषय ठरली. अहवालांनुसार, रेखा आणि इमरान मुंबईच्या समुद्रकिनारी एकत्र वेळ घालवत असत. तसेच, क्रिकेटर रेखाच्या चित्रपट शूटिंगवर येत असे. 1985 मध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालात सांगितले की इमरान आणि रेखा ‘प्रेमाचे रंग उधळत’ आहेत आणि एकमेकांवर पूर्णपणे फिदा आहेत. अहवालानुसार, ‘ज्यांनी रेखा आणि इमरानला समुद्रकिनारी एकत्र पाहिले, त्यांना त्यांच्या जवळीकीने प्रभावित केले आणि दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करतात असे स्पष्ट झाले.’

आईने घेतला ज्योतिषाचा सल्ला

अहवालात हेही सांगितले की रेखाची आई पुष्पावली तिच्या मुलीच्या इमरानसोबतच्या नात्याबद्दल खूप आनंदी होती. कारण तिला इमरान तिच्या मुलीसाठी सर्वात योग्य वाटत होता. फक्त एवढेच नव्हे, पुष्पावली त्यांच्या लग्नासाठी उत्सुक होत्या आणि त्यासाठी ज्योतिषाकडून सल्ला घेतद होत्या. अहवालात सांगितले की, ‘त्या दिल्लीत गेल्या आणि एका ज्योतिषाला विचारले की इम्रान तिच्या मुलीसाठी योग्य आहे का? ज्योतिषाने काय सांगितले हे कोणालाच माहीत नाही, पण रेखाची आई मानत होती की इमरान त्यांच्या कुटुंबासाठी योग्य होता.’ पण रेखाने कधीही उघडपणे या नात्याची कबुली दिली नाही. त्या दोघांचे नातेही तुटले.