Amitabh Bachchan: मित्राचा बंगला, संध्याकाळ अभिताभ बच्चन यांच्यासोबत घालवायची म्हणून रेखाने…, प्रसिद्ध दिग्दर्शकाचा मोठा खुलासा

Amitabh Bachchan: महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री रेखा यांच्याबद्दल अनेक चर्चा आजही रंगत असतात. पण एक काळ असा होता जेव्हा, बिग बींसोबत संध्याकाळ घालवता येईल यासाठी रेखा यांनी मोठं पाऊल उटललं होतं. याबद्दल प्रसिद्ध दिग्दर्शकाने खुलासा केला आहे.

Amitabh Bachchan: मित्राचा बंगला, संध्याकाळ अभिताभ बच्चन यांच्यासोबत घालवायची म्हणून रेखाने..., प्रसिद्ध दिग्दर्शकाचा मोठा खुलासा
Amitabh Bachchan Rekha
| Updated on: Oct 11, 2026 | 10:48 AM

Amitabh Bachchan: बॉलिवूडच्या एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा यांच्या अफेअर किस्से कायम चर्चेत राहिले. रेखा कायम खऱ्या प्रेमाच्या शोधात राहिल्या. पण खरं प्रेम त्यांना कधी भेटलंच नाही. रेखा यांनी ज्या पुरुषावर प्रेम केलं, तो अभिनेत्रीला सोडून गेला. जेव्हा रेखा ‘दो अनजाने’ सिनेमाच्या सेटवर महानायक अमिताभ बच्चन यांना भेटल्या, तेव्हा बिग बी विवाहित होते. अशात ज्या चर्चा रंगल्या त्या आजही चर्चेत आहेत. तेव्हा असा दावा करण्यात आला होता, रेखा आणि बिग बी रोमँटिक रिलेशनशिपमध्ये आहेत आणि दोघे एकमेकांना गुपचूप भेटतात. पण एका सेलिब्रिटीला त्यांच्या नात्याबद्दल कळलं आणि त्याने रेखा – बिग बींच्या नात्याचा खुलासा केला.

रिपोर्टनुसार, अमिताभ बच्चन आणि रेखा यांना त्यांचं नातं खासगी ठेवायचं होतं. असं देखील म्हणतात की, रेखा त्यांच्या एका मित्राच्या बंगल्यात अमिताभ बच्चन यांना गुपचूप भेटायच्या.. पण ‘गंगा की सौगंध’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यान दोघांच्या नात्याचं सिक्रेट समोर आलं. कारण जेव्हा दुसरा अभिनेता रेखा यांच्यासोबत वाईट वर्तण करत होता, तेव्हा अमिताभ बच्चन प्रचंड भडकले.. या घटनेबद्दल अनेक न्यूजपेपरमध्ये छापून देखील आलं आणि दोघांच्या नात्याच्या चर्चांनी जोर धरला.

Loading...

अभिनेते रंजीत यांनी सांगितलं नात्याचं सिक्रेट…

रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या नात्याचं सत्य तेव्हा समोर आलं जेव्हा प्रसिद्ध खलनायक रंजीत याने यावर मोठं वक्तव्य केलं. सांगायचं झालं तर, ‘कारनामा’ सिनेमात दिग्दर्शकांना रेखा यांना कास्ट करायचं होतं. पण त्यांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे ते शक्य झालं नाही. याच कारणामुळे फराह नाझ हिला कास्ट करण्यात आलं. मीडियारिपोर्टनुसार, रंजीत यांनी एका जुन्या मुलाखतीत सांगितलं होतं की, ‘एक दिवस मला रेखा यांनी फोन केला आणि विनंती केली की, शुटिंगचं शेड्यूल सकाळी करा. कारण त्यांना संख्याकाळ अमिताभ बच्चन यांच्यासोबत घालवायची होती…’

रेखा यांच्यापासून अमिताभ बच्चन का झाले दूर…

त्या काळात रेखा आणि अमिताभ यांच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं होतं. लोकांच्या पसंतीस त्यांची ‘केमिस्ट्री’ उतरली होती, परंतु जेव्हा त्यांचं नातं चर्चेत आलं, तेव्हा त्यांनी एकत्र काम करणं थांबवलं. साहजिकच, यामुळे जया बच्चन यांना खूप दुःख झालं. त्या परिस्थितीत अमिताभ बच्चन यांनी कुटुंबाला अधिक प्राधान्य दिलं. यश चोप्रा दिग्दर्शित ‘सिलसिला’ या सिनेमात हे दोघे अखेरचे एकत्र दिसले होते.

एकट्याच आयुष्य जगत आहेत रेखा…

एका मुलाखतीत अमिताभ बच्चन यांना विचारण्यात आलं, रेखा यांच्यासोबत स्क्रिन का शेअर करत नाही. यावर 80 वर्षांच्या बिग बींनी थेट उत्तर दिलेलं की, ‘कोणी चांगली कथा घेऊन आलंच नाही…’, सांगायचं झालं तर, रेखा यांचं नाव अमिताभ बच्चन यांच्यासोबतच संजय दत्त, अक्षय कुमार आणि विनोद मेहरा यांच्यासोबत देखील जोडण्यात आलं… आज वयाच्या 72 व्या वर्षी रेखा एकट्याच आयुष्य जगत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us