Renuka Shahane : आमचं नातं टिकलं नाही, त्यामुळे…विजय केंकरेंसोबतच्या घटस्फोटाबद्दल स्पष्टच बोललेल्या रेणुका शहाणे

Renuka Shahane : रेणुका शहाणे यांनी एका जुन्या मुलाखतीत त्यांच्या पहिल्या घटस्फोटाबद्दल भाष्य केलं आहे.

Renuka Shahane : आमचं नातं टिकलं नाही, त्यामुळे...विजय केंकरेंसोबतच्या घटस्फोटाबद्दल स्पष्टच बोललेल्या रेणुका शहाणे
| Updated on: Oct 08, 2026 | 3:05 PM

रेणुका शहाणे त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. रेणुका शहाणे आणि आशुतोष राणा यांच्या लग्नाला 20 वर्षांहून अधिक वर्ष झाली आहेत.  रेणुका यांचं पहिलं लग्न सुप्रसिद्ध दिग्दर्शक विजय केंकरे यांच्याशी झालेलं. मात्र, त्यांचा घटस्फोट झाला. एका जुन्या मुलाखतीत रेणुका यांनी विजय यांच्या घटस्फोटाबद्दल भाष्य केलेलं. रेणुका यांनी सांगितलेलं की, आमचं लग्न जरी यशस्वी झालं नसलं तरी ते व्यक्ती म्हणून खूप चांगले आहेत.

 

Loading...

काय म्हणाल्या रेणुका शहाणे?

रेणुका घटस्फोटाबद्दल म्हणाल्या की, ‘घटस्फोटाचा माझ्यावर परिणाम झाला, कारण प्रत्येकाला आपलं नातं टिकावं असंच वाटतं आणि याच कारणासाठी मला लवकर लग्न करायचं होतं. मात्र, ते नातं टिकू शकलं नाही. आम्ही दोघंही खूप चांगले व्यक्ती होतो, पण दुर्दैवानं पती-पत्नी म्हणून आमचं नातं टिकू शकलं नाही. त्यामुळे शक्य तितक्या चांगल्या पद्धतीनं वेगळं होणं आणि या अनुभवातून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करणं, हीच योग्य गोष्ट आहे.’

‘मला वाटतं की या अनुभवातून मला खूप काही मिळालं. कारण खूप मोठ्या कालावधीनंतर जेव्हा मी आशुतोष राणा यांच्या प्रेमात पडले, तेव्हा लग्नाबद्दलचा माझा दृष्टिकोन नक्कीच पूर्वीसारखा नव्हता. तो अधिक वास्तववादी झाला. त्यामुळे नात्यात येणारे अनेक चढ-उतार मी अधिक सहजपणे हाताळू शकले. त्यात माझी परिपक्वताही कारणीभूत होती. माझं लग्न झालं तेव्हा माझं वय ३४ किंवा ३५ वर्षे होतं. भारतात लग्न करण्यासाठी हेही जास्त वय आहे.’ असं रेणुका यांनी शेवटी म्हटलं. ‘पिंकव्हिला’ला दिलेल्या मुलाखतीत रेणुका शहाणे बोलत होत्या. 

 

दरम्यान, विजय केंकरे यांनी अनेक गाजलेल्या सिनेमांचं दिग्दर्शन केलं असून त्यांनी हिंदी सिनेमांमध्येही काम केलं आहे. घटस्फोटानंतर लग्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला, असंही रेणुका म्हणाल्या. 

 

रेणुका यांच्या कामाबद्दल सांगायचं तर त्यांनी ‘हम आपके है कौन’, ‘देवमाणूस’, ‘सैलाब’, ‘बकेट लिस्ट’ यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं आहे.   

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us