
सोनी टीव्हीचा डान्सिंग रिअॅलिटी शो 'सुपर डान्सर चॅप्टर 4' मध्ये या आठवड्यात स्पर्धक ब्लॅक अँड व्हाईट थीममध्ये झळकणार आहेत. या खास प्रसंगी, कलाकारांसोबतच शोचे जज सुद्धा 'ब्लॅक अँड व्हाईट' अर्थात रेट्रो स्टाईलमध्ये दिसतील.

हटके स्टाईलसाठी प्रसिद्ध असलेली शिल्पा शेट्टी यावेळी पोलका डॉट साडीमध्ये दिसणार आहे. ज्यामध्ये तिनं स्लीव्हलेस ब्लाउज कॅरी केलं आहे. या गेटअपमध्ये शिल्पाला पाहून सगळे घायाळ झाले आहेत. शिल्पाच्या चाहत्यांनी प्रथमच तिला अशा अंदाजात पाहिलं आहे. तिनं शोचे होस्ट परितोश त्रिपाठी यांच्यासोबत फिल्मी पोजही दिल्या आहेत.

सुप्रसिद्ध अभिनेते अन्नू कपूर यावेळी सुपर डान्सर चॅप्टर 4 च्या या स्पेशल एपिसोडमध्ये पाहुणे म्हणून येणार आहेत.

या फोटोत सुपर डान्सर चॅप्टर 4 ची सर्व मुलं अन्नू कपूर आणि शोच्या होस्टसोबत नाचताना दिसत आहेत.

शिल्पा शेट्टीनं तिच्या रेट्रो लूकचा खरोखर आनंद घेतलाय.

शोचे जज गीता कपूर आणि अनुराग बासूसुद्धा या भागात खूप डान्स करताना दिसणार आहेत.