AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लिल्लू ते बेबू, सुशांतच्या नोट्समध्ये उल्लेख, रियाकडे सुशांतची खास भेट

रिया चक्रवर्तीने सुशांतच्या नोट्समार्फत आपल्यावरील आरोपांवर खुलासा केला आहे (Rhea Chakraborty publish Sushant Singh Notes).

लिल्लू ते बेबू, सुशांतच्या नोट्समध्ये उल्लेख, रियाकडे सुशांतची खास भेट
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Aug 08, 2020 | 12:12 PM
Share

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात सुशांतची मैत्रीण अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर अनेक गंभीर आरोप होत आहेत. याच पार्श्वभूमीवर रियाने सुशांतच्या नोट्समार्फत आपल्यावरील आरोपांवर खुलासा केला आहे (Rhea Chakraborty publish Sushant Singh Notes). सुशांतची कोणतीही मालमत्ता माझ्याकडे नाही. माझ्याकडे केवळ त्याची पाणी पिण्याची बाटली आहे. सुशांतचं आपल्याबद्दल आणि कुटुंबाबाबत काय मत होतं, तो काय म्हणायचं हे सांगणाऱ्या नोट्सच रियाने प्रसिद्ध केल्या आहेत.

रियाने प्रसिद्ध केलेल्या या नोट्समध्ये सुशांतने त्याच्या आयुष्यात कुणाकुणाला महत्त्वाचं स्थान आहे याविषयी लिहिलं आहे. सुशांतने आत्महत्येआधी या नोट्स लिहिल्याचा दावा रियाने केला आहे. सुशांतच्या वडिलांनी रियाविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर आणि सीबीआय-ईडीच्या चौकशीनंतर रियाने या गोष्टी समोर आणल्या आहेत.

या नोट्समध्ये सुशांत लिहितो, “मी माझ्या आयुष्यात आनंदी आहे. माझ्या आयुष्यात लिल्लू (रियाचा भाऊ शोविक) आल्यामुळे मी कृतज्ञ आहे. माझ्या आयुष्यात बेबु (रिया) आल्यामुळे मी कृतज्ञ आहे. माझ्या आयुष्यात सर (रियाचे वडील) आल्याबद्दल मी कृतज्ञ आहे. माझ्या आयुष्यात मॅम (रियाची आई) आल्यामुळे मी कृतज्ञ आहे. माझ्या आयुष्यात फ्युडी (कुत्रे) आल्यामुळे मी कृतज्ञ आहे. तुम्ही सर्व माझ्या आयुष्यात आल्यामुळे मी कृतज्ञ आहे.”

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

दरम्यान, अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीची ईडीकडून कसून चौकशी सुरु आहे (ED interrogates actress Riya Chakraborty). ईडीच्या 4 अधिकाऱ्यांनी रियाची कसून चौकशी केली. ईडी कार्यालयात रियासोबत तिचे वडील इंद्रजीत चक्रवर्ती, भाऊ शौविक चक्रवर्ती, सुशांतची माजी मॅनेजर श्रुती मोदी उपस्थित आहेत.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

ईडीकडून रियाची शुक्रवारी (7 ऑगस्ट) जवळपास 5 ते 6 तास चौकशी झाली. सुशांतच्या बँक खात्यातून रियावर सुशांतच्या वडिलांनी 15 कोटी रुपये दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर केल्याचा आरोप केला आहे. या आरोपांबाबत ईडी रियाची चौकशी करु शकते (ED interrogates actress Riya Chakraborty).

संबंधित व्हिडीओ :

हेही वाचा :

ईडीकडून रियाची कसून चौकशी, भाऊ शौविक कागदपत्रे घेऊन पुन्हा कार्यालयात दाखल

Sushant Death Case | रियाचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडाची 9 तास ईडी चौकशी, आता रियाचा नंबर

रियाकडे कोट्यावधींचे दोन फ्लॅट, सुशांतच्या खात्यातून 15 कोटीच्या व्यवहाराचा आरोप, ईडी अ‍ॅक्शन मोडमध्ये

Rhea Chakraborty publish Sushant Singh Notes

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?