Sushant Death Case | रियाचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडाची 9 तास ईडी चौकशी, आता रियाचा नंबर

रिया चक्रवर्तीकडे कोट्यवधी रुपये किमतीचे दोन फ्लॅट असल्याचं ईडीच्या तपासात उघड झालं आहे. या फ्लॅटमधील गुंतवणुकीची कसून चौकशी होत आहे

Sushant Death Case | रियाचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडाची 9 तास ईडी चौकशी, आता रियाचा नंबर

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा याची ईडीकडून जवळपास 9 तास कसून चौकशी झाली. ईडी आफिसमधून चौकशीनंतर बाहेर पडलेला सॅम्युअल मीडियाशी काहीही न बोलता निघून गेला. त्यानंतर आज रियाची चौकशी होणार आहे. (ED summons Rhea Chakraborty in Sushant Singh Rajput Death Case)

मिरांडा काल (गुरुवार) दुपारी दीड वाजता ईडी कार्यालयात हजर झाला. मिरांडा रियाचे आर्थिक व्यवहार पहायचा. बँक खाती, पैसे काढणे, पैसे भरणे, आर्थिक व्यवहार अशी कामे तो करायचा.

रिया चक्रवर्तीकडे कोट्यवधी रुपये किमतीचे दोन फ्लॅट असल्याचं ईडीच्या तपासात उघड झालं आहे. या फ्लॅटमधील गुंतवणुकीची कसून चौकशी होत आहे. फ्लॅटचा व्यवहार आता ईडीच्या रडार आहे. रियाला आज (शुक्रवार 7 ऑगस्ट) चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्याचं समन्स बजावण्यात आलं आहे.

रियाने सुशांतच्या बँक खात्यातून सुमारे 15 कोटी रुपये दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर केल्याचा आरोप सुशांतच्या कुटुंबीयांनी केला आहे. हा सर्व व्यवहार संशयास्पद असल्याने त्याचा तपास आता ईडीचे अधिकारी करत आहेत.

ईडीने आतापर्यंत या प्रकरणात चौघांचे जबाब घेतले आहेत. आधी सुशांतचे सीए संदीप श्रीधर आणि सुशांतच्या एका मित्राचा जबाब घेतला आहे. यानंतर आता रियाशी सबंधित व्यक्तींचे जबाब घेतले जात आहेत. 15 कोटी रुपयांची मनीं लाँड्रिंग कशी झाली, सुशांतच्या बँक खात्यातून कोणाच्या खात्यात पैसे गेले आहेत, ती व्यक्ती कोण आहे, याचा शोध ईडीचे अधिकारी घेत आहेत.

दुसरीकडे बिहार सरकारच्या सीबीआय चौकसीच्या प्रस्तावानंतर केंद्र सरकारने सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. केंद्र सरकारने याबाबत आदेश दिले. सीबीआयने तातडीने या प्रकरणी रिया चक्रवर्ती, तिचे वडील इंद्रजीत चक्रवर्ती, आई संध्या चक्रवर्ती, भाऊ शोविक चक्रवर्ती, मॅनेजर सॅम्युअल मिरांडा, श्रुती मोदी आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

बिहार पोलिसांनी रिया चक्रवर्ती हिच्याविरोधात दाखल केलेला गुन्हा सीबीआयकडे वर्ग केला आहे. सीबीआयनेही त्यावर गुन्हा दाखल करुन घेतला आहे. ही कृती बेकायदेशीर असल्याचं रिया चक्रवर्ती हिचे वकील सतीश मानेशिंदे यांचं म्हणणं आहे. (ED summons Rhea Chakraborty in Sushant Singh Rajput Death Case)

“प्रत्यक्षात गुन्हा सीबीआयकडे वर्ग करण्यास बिहार पोलिसांकडे कोणताही कायदेशीर आधार नाही. बिहार पोलिसांनी कायदेशीर बाजू असलेल्या महाराष्ट्र पोलिसांकडे गुन्हा वर्ग करायला हवा होता. रिया चक्रवर्तीने सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत हाच मुद्दा अधोरेखित केला आहे. सुप्रीम कोर्टाने देखील त्याची दखल घेतली आहे. याचमुळे सुप्रीम कोर्टाने सर्व प्रतिवादीना प्रतिज्ञापत्र सादर करायला सांगितलं आहे” असे वकील सतीश मानेशिंदे म्हणाले.

संबंधित बातम्या :

Sushant Singh case | CBI चौकशीचा प्रस्ताव केंद्राने स्वीकारला, कोर्टाकडून दोन्ही सरकारांना म्हणणं मांडण्याचे आदेश

Sushant Death Case | “मुंबई पोलिसांनी 50 दिवसांत काय केलं?” बिहार पोलिस महासंचालकांचा सवाल

…तर माझ्या मुलाचा जीव वाचला असता, सुशांतच्या वडिलांचा मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप

(ED summons Rhea Chakraborty in Sushant Singh Rajput Death Case)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *