Sushant Singh case | CBI चौकशीचा प्रस्ताव केंद्राने स्वीकारला, कोर्टाकडून दोन्ही सरकारांना म्हणणं मांडण्याचे आदेश

Sushant Singh case | CBI चौकशीचा प्रस्ताव केंद्राने स्वीकारला, कोर्टाकडून दोन्ही सरकारांना म्हणणं मांडण्याचे आदेश

कोर्टाने महाराष्ट्र सरकार, बिहार सरकार आणि सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबियांना 3 दिवासात आपली बाजू मांडण्याचे निर्देश दिले. Center accepts Bihar request of CBI probe in Sushant Case

सचिन पाटील

|

Aug 05, 2020 | 1:09 PM

नवी दिल्ली : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात वेगवान घडामोडी घडत आहेत. सुशांतची मैत्रिण रिया चक्रवर्तीच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने महाराष्ट्र सरकार, बिहार सरकार आणि सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबियांना 3 दिवासात आपली बाजू मांडण्याचे निर्देश दिले. याशिवाय कोर्टाने महाराष्ट्र सरकारला याप्रकरणाच्या तपासाचा रिपोर्ट सादर करण्याचे आदेश दिले आहेत. (Center accepts Bihar request of CBI in Sushant Case)

रिया चक्रवर्तीविरोधात सुशांतच्या कुटुंबियांनी बिहारमध्ये गुन्हा दाखल केला आहे. मात्र हा खटला मुंबईत हस्तांतरीत करावा अशी मागणी रिया चक्रवर्तीची आहे. याबाबत आज झालेल्या सुनावणीदरम्यान कोर्टाने दोन्ही सरकारांना आपलं म्हणणं मांडण्याचे आदेश दिले. आज सुप्रीम कोर्टाने सर्वांच्या बाजू ऐकून घेतल्या. आता याप्रकरणी पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे.

यावेळी सर्वोच्च न्यायालयाने बिहारच्या ips अधिकाऱ्यांना चौकशीपासून रोखणे चांगले संकेत नसल्याचं म्हणत महाराष्ट्र सरकारला सुनावलं. कोण कशी चौकशी करत आहे माहीत नाही, पण महाराष्ट्र सरकारने चौकशीबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी असे मत कोर्टाने मांडले.

बिहार सरकारकडून CBI चौकशीची मागणी

दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सुशांतच्या कुटुंबियांच्या मागणीवरुन याप्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसांऐवजी CBI मार्फत करावी, अशी विनंती केंद्र सरकारकडे केली आहे. केंद्राने ही मागणी मान्य केली आहे. केंद्र सरकारकडून याबाबतची अधिसूचना आज संध्याकाळपर्यंत जारी केली जाणार आहे.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी बिहार सरकारचा सीबीआय चौकशीचा प्रस्ताव केंद्र सरकारने स्वीकारले आहे. केंद्र सरकार लवकरच सीबीआय चौकशीचे आदेश देऊ शकते अशी माहिती सर्वोच्च न्यायालयात महाधिवक्ते तुषार मेहता यांनी दिली. यामुळे रिया चक्रवर्ती यांच्या केसच्या बदलीचा प्रश्नच येत नाही यामुळे या याचिकावर सुनावणी करण्याची गरज नाही, असं मेहता यांनी कोर्टात नमूद केलं.

सुशांतच्या वडिलांचा महाराष्ट्र पोलिसांवर आरोप

महाराष्ट्र पोलीस सुशांत सिंह राजपूत आत्महत्येचे पुरावे नष्ट करत आहे, असा आरोप सुशांत सिंहचे वडील के के सिंह यांनी केला आहे.

(Center accepts Bihar request of CBI in Sushant Case)

संबंधित बातम्या 

Sushant Singh Rajput | सुशांतच्या आत्महत्येचा तपास सीबीआयकडे द्या, नितीशकुमार यांची केंद्राकडे शिफारस 

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें