Sushant Singh Rajput | सुशांतच्या आत्महत्येचा तपास सीबीआयकडे द्या, नितीशकुमार यांची केंद्राकडे शिफारस

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयला सोपवण्याची शिफारस बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केली आहे.

Sushant Singh Rajput | सुशांतच्या आत्महत्येचा तपास सीबीआयकडे द्या, नितीशकुमार यांची केंद्राकडे शिफारस

पाटणा : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा (CM Nitish Kumar Recommends CBI Inquiry) तपास सीबीआयला सोपवण्याची शिफारस बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केली आहे. मंगळवारी सुशांतच्या कुटुंबाच्या मागणीवर नितीश कुमारांनी हा निर्णय घेतला. बिहारमधील सत्तारुढ पक्ष जेडीयूचे प्रवक्ता संयज सिंह यांनी याबाबतची माहिती दिली. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी बिहार सरकारने सीबीआय चौकशीसाठी प्रस्ताव केंद्राकडे पाठविला आहे, असं त्यांनी सांगितलं (CM Nitish Kumar Recommends CBI Inquiry).

नितीश कुमारांचं ट्वीट –

दुसरीकडे, या प्रकरणाचा सीबीआय तपास व्हावा यासाठी मुंबई उच्च न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता यांच्या अध्यक्षतेत खंडपीठात होणारी सुणावणी पुढे ढकलण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे न्यायालयाचचं कामकाज आज स्थगित करण्यात आलं.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर

महासंचालक संजय सिंहांचं इक्बाल सिंह चहल यांना पत्र

पटणा रेंजचे महानिरीक्षक संजय सिंह यांनी मुंबईच्या महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना पत्र लिहलं आहे. पटणाचे एसपी विनय तिवारी यांना क्वारंटाईन मुक्त करण्याची विनंती केली आहे. कारण, ते सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्ये प्रकरणाचा तपास करत आहेत. त्यामुळे ते क्वारंटाईन असल्याने तपासात अडथळा येत आहे (CM Nitish Kumar Recommends CBI Inquiry).

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास बिहार पोलिसांनी सुरु करताच एक नवा वाद उफाळला आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी बिहारचे एसपी विनय तिवारी हे मुंबईत पोहोचताच मुंबई महापालिकेने गाईडलाईन्सचं पालन करत त्यांना क्वारंटाईन केलं.

सुशांत सिंह राजपूतची राहत्या घरी आत्महत्या

सुशांत सिंह राजपूत याने रविवारी 14 जून 2020 रोजी मुंबईतील वांद्रे इथल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. त्यामुळे पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा दाखल केला. मात्र, सुशांतच्या मृत्यूबाबत त्याच्या कुटुंबाने आक्षेप नोंदवला आहे. त्यामुळे पोलिसांनी याबाबत तपास सुरु केला. सुशांत सिंह राजपूत आत्महत्येचा तपास वांद्रे पोलीस, सायबर सेल, फॉरेन्सिक विभाग आणि मुंबई क्राईम ब्रांचकडून होत आहे.

CM Nitish Kumar Recommends CBI Inquiry

संबंधित बातम्या :

बिहार पोलिसांना चुकीची वागणूक, उद्धव ठाकरेंशी बोला, चिराग पासवान यांची नितीशकुमारांना विनंती

…तर माझ्या मुलाचा जीव वाचला असता, सुशांतच्या वडिलांचा मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप

Sushant Death Case | Painless Death विषयी गुगल सर्च, स्किझोफ्रेनियाचीही माहिती, सुशांतने आत्महत्येपूर्वी काय काय केलं?

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *