बिहार पोलिसांना चुकीची वागणूक, उद्धव ठाकरेंशी बोला, चिराग पासवान यांची नितीशकुमारांना विनंती

नितीशकुमार यांनी सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सीबीआय चौकशीची शिफारस केल्याची माहिती आहे.

बिहार पोलिसांना चुकीची वागणूक, उद्धव ठाकरेंशी बोला, चिराग पासवान यांची नितीशकुमारांना विनंती

पाटणा : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सीबीआय चौकशीचे आदेश द्या, अशी विनंती केंद्रीय मंत्री राम विलास पासवान यांचे चिरंजीव आणि लोकशक्ती पक्षाचे नेते चिराग पासवान यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पत्राद्वारे केली आहे. सुशांतच्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीसाठी मुंबईत आलेल्या बिहारमधील पोलिस अधिकाऱ्यांना चुकीची वागणूक दिल्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलण्याची विनंतीही पासवान यांनी केली. (Chirag Paswan requests Bihar CM Nitish Kumar to speak with Maharashtra CM Uddhav Thackeray)

“बिहारमध्ये दाखल केलेला खटला सीबीआयकडे हस्तांतरित करण्याची संधी आपल्याकडे आहे. कारण आज बिहार आणि महाराष्ट्र पोलिस दोघेही या प्रकरणाचा तपास करत आहेत, पण जर चौकशी महाराष्ट्र सरकारकडे सोपवली गेली तर ती सीबीआयकडे वर्ग करण्याची संधी बिहार सरकारच्या हातातून निसटेल” असे चिराग पासवान यांनी नितीशकुमारांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. नितीशकुमार यांनी सीबीआय चौकशीची शिफारस केल्याची माहिती आहे.

हेही वाचा : “मुंबई पोलिसांनी 50 दिवसांत काय केलं?” बिहार पोलिस महासंचालकांचा सवाल

“अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या निधनाला जवळपास 50 दिवस उलटून गेले, मात्र अद्यापही त्याच्या मृत्यूचे नेमके कारण अस्पष्ट आहे. सत्य बाहेर न आल्याने बिहार, तसेच देश आणि जगभरातील त्याचे चाहते संतप्त आणि निराश झाले आहेत. सत्य लवकरात लवकर उघड व्हावे, यासाठी सीबीआय चौकशीची मागणी त्याचे चाहते करत आहेत” असेही पासवान म्हणाले.

सुशांतच्या मृत्यूनंतर आठवड्याभरातच चिराग पासवान यांनी सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाची निःपक्षपाती चौकशीची मागणी केली होती. बॉलिवूडमधील गटबाजीवर प्रकाश टाकणारे एक पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले होते.

देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्या व्यक्तींसाठी नियमावली ठरवण्यात आली आहे, त्यानुसार पाटणा शहराचे पोलिस अधीक्षक विनय तिवारी यांना होम क्वारंटाईन करण्यात आले, असे स्पष्टीकरण मुंबई महापालिकेने दिले आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबईला आलेल्या बिहारच्या एसपींना बळजबरीने क्वारंटाईन केल्याचा आरोप बिहारचे पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी केला होता.

संबंधित बातमी :

सुशांत सिंह आत्महत्येवरुन बिहारमध्ये संताप, चिराग पासवान यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन

Chirag Paswan requests Bihar CM Nitish Kumar to speak with Maharashtra CM Uddhav Thackeray

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *