
मुंबई : सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानंतर एक नाव प्रचंड चर्चेत आले ते म्हणजे रिया चक्रवर्ती हिचे. रिया चक्रवर्ती हिने नुकताच तिचा तुरुंगातील अनुभव हा शेअर केलाय. रिया चक्रवर्ती हिने नुकताच एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये काही मोठे खुलासे करताना रिया चक्रवर्ती दिसली. तिने सांगितले की, तुरुंगातील आयुष्य नेमके कसे आहे. तिथे उपस्थित असलेल्या महिला या कशाप्रकारे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंदी होतात.
सुशांत सिंह राजपूत याच्या निशाणानंतर रिया चक्रवर्ती हिच्यावर अनेक गंभीर आरोप हे केले गेले. इतकेच नाही तर थेट काही दिवस जेलमध्ये राहण्याची वेळ ही रिया चक्रवर्ती हिच्यावर आली. सुशांत सिंह राजपूत याच्या चाहत्यांच्या निशाण्यावर रिया चक्रवर्ती आली. सतत सोशल मीडियावर रिया चक्रवर्ती हिला खडेबोल सुनावले जातात.
रिया चक्रवर्ती म्हणाली की, मी अंडर ट्रायल तुरुंगात होते. तिथे माझ्यासोबत अनेक महिला देखील होत्या. तुरुंगात टाकले जाते म्हणजे तुम्हाला समाजापासून वेगळे ठेवण्यात येते. समाजामध्ये तुम्हाला अयोग्य मानले जाते. तिथे जाणे सर्वांसाठी निराशाजनक आहे. मात्र, तिथे गेल्यावरच कळते की, आयुष्यातील आनंद कशाला म्हणतात.
गेल्या काही दिवसांपासून रिया चक्रवर्ती ही सतत मुलाखती देताना दिसतंय. या मुलाखतींमध्ये रिया चक्रवर्ती ही मोठे खुलासे करताना दिसत आहे. इतकेच नाही तर रिया चक्रवर्ती ही तिच्या पर्सनल लाईफमुळेही चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच रिया चक्रवर्ती हिला थेट व्यावसायिक निखिल कामथ यांच्यासोबत स्पाॅट केले गेले. निखिल कामथ आणि रिया चक्रवर्ती हे एकाच गाडीमध्ये बसून निघून गेले.
पापाराझी यांना पाहून रिया चक्रवर्ती ही चेहरा लपवण्याचा प्रयत्न करताना दिसली. तेंव्हापासूनच एक चर्चा आहे की, रिया चक्रवर्ती ही निखिल कामथ याचा डेट करतंय. निखिल कामथ हा तब्बल 23 हजार कोटी संपत्तीचा मालक आहे. रियाचे आणि निखिल कामथ यांचे अनेक फोटोही व्हायरल होताना दिसले. मात्र, अजूनही रिया चक्रवर्ती हिच्याकडून निखिल कामथ याच्यासोबत असलेल्या रिलेशनवर भाष्य करण्यात नाही आले.