AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rhea Chakraborty | 23 हजार कोटी संपत्तीचा मालक असलेल्या व्यावसायिकाला रिया चक्रवर्ती करतंय डेट? ‘तो’ फोटो व्हायरल

रिया चक्रवर्ती ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. रिया चक्रवर्ती हिच्यावर सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानंतर गंभीर आरोप करण्यात आले. फक्त आरोपच नाही तर थेट रिया चक्रवर्ती हिला काही दिवस जेलमध्ये राहण्याची वेळ आली.

Rhea Chakraborty | 23 हजार कोटी संपत्तीचा मालक असलेल्या व्यावसायिकाला रिया चक्रवर्ती करतंय डेट? 'तो' फोटो व्हायरल
| Updated on: Oct 21, 2023 | 11:04 PM
Share

मुंबई : सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानंतर एक नाव प्रचंड चर्चेत आले. ते नाव म्हणजे रिया चक्रवर्ती. रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) हिच्यावर अनेक गंभीर आरोप केले गेले. इतकेच नाही तर थेट काही महिने जेलमध्ये राहण्याची वेळ रिया चक्रवर्ती हिच्यावर आली. सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या चाहत्यांचा नेहमीच रिया चक्रवर्ती हिच्यावर रोष बघायला मिळतो. रिया चक्रवर्ती आणि महेश भट्ट यांचे व्हायरल होणारे फोटो पाहून लोक हैराण झाले.

फक्त रिया चक्रवर्ती हिच नाही तर सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानंतर तिच्या भावावर देखील जेलमध्ये राहण्याची वेळ आली. रिया चक्रवर्ती हिचाच सुशांतच्या निधनामध्ये हात असल्याचे अनेकांनी सांगितले. रिया चक्रवर्ती हिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका देखील करण्यात आली. रिया चक्रवर्ती हिच्यावर होत असलेले आरोप पाहून लोक हैराण झाले.

रिया चक्रवर्ती ही आता जुन्या गोष्टी विसरून परत एकदा प्रेमात पडल्याचे सांगितले जातंय. सुशांत सिंह राजपूत याला विसरून आयुष्यामध्ये पुढे जाताना रिया चक्रवर्ती ही दिसतंय. विशेष म्हणजे यावेळी रिया चक्रवर्ती ही एका व्यावसायिकाला डेट करत आहे. हा व्यावसायिक आज कोट्यवधी संपत्तीचा मालक आहे.

रिया चक्रवर्ती हिचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे व्हायरल होणारे व्हिडीओ आणि फोटो हे रात्री उशीराचे आहेत. रिया चक्रवर्ती ही व्यावसायिक निखिल कामथ याला डेट करत असल्याची जोरदार चर्चा आहे. निखिल कामथ याच्यासोबत रिया चक्रवर्ती ही स्पाॅट झालीये. विशेष म्हणजे दोघे एकाच गाडीमध्ये बसून निघून गेले.

यावेळी रिया चक्रवर्ती ही कॅमेऱ्यापासून आपला चेहरा लपवण्याचा प्रयत्न करताना दिसली. मात्र, शेवटी कॅमेऱ्यामध्ये रिया चक्रवर्ती ही कैद झालीये. निखिल कामथ हा तब्बल 23 हजार कोटी संपत्तीचा मालक आहे. अत्यंत कमी वेळामध्ये आणि स्वत: च्या मेहनतीने निखिल कामथ याने ही संपत्ती मिळवली आहे.

आता याच निखिल कामथ याला रिया चक्रवर्ती डेट करत असल्याची जोरदार चर्चा आहे. मात्र, निखिल कामथ याच्यासोबत रिया चक्रवर्ती हिला पाहून लोकांनी तिला ट्रोल करण्यास सुरूवात केलीये. एकाने लिहिले की, नवीन बकरा. दुसऱ्याने लिहिले की, निखिल कामथ हिला सोड नाही तर दुसरा सुशांत सिंह राजपूत होणार तू.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?