
अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या निधनाला 5 वर्ष झाली आहे. तरी देखील अभिनेत्याची चर्चा कायम सुरु असते. सुंशात याच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये मोठी खळबळ माजली होती. अनेक सेलिब्रिटींची चौकशी देखील करण्यात आली. यामध्ये प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेते आणि अभिनेत्री देखील होत्या. पण एका अभिनेत्रीला तर, जवळपास एक महिना तुरुंगात राहावं लागलं. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, अभिनेत्री रिया चक्रिवर्ती आहे. सुंशात याच्या निधनानंतर रिया आणि तिच्या कुटुंबियांना मोठ्या संकटांचा सामना कारावा लागला. कठीण वेळी रिया हिच्या मैत्रीणी धावत आल्या, ज्यामुळे रिया हिचे आई – वडील आज सुखरुप आहे… पॉडकास्ट दरम्यान रिया हिने मोठा खुलासा केला आहे.
सुशांत याच्या निधनानंतर अभिनेत्याच्या कुटुंबियांनी रिया हिला दोषी ठरवलं… त्यानंतर नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने रिया आणि तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती याला अटक केली. रिया जवळपास 1 वर्ष तुरुंगात होती. अखेर सुशांत सिंह हत्या प्रकरणातून रिया हिला 2025 मध्ये क्लिन चिट मिळाली. नुकताच, रिया हिने तिच्या पॉडकास्टमध्ये तेव्हा नक्की काय झालेलं सांगितलं. अशा कठीण काळात रिया हिला तिच्या मैत्रिणींची साथ मिळाली.
रिया चक्रवर्ती हिने ‘पॉडकास्ट चॅप्टर 2’ मध्ये गेस्ट म्हणून तिच्या गर्ल गँगला बोलावलं होतं. रिया म्हणाली, 2020 हे वर्ष अत्यंत वाईट होतं… यावर अनुषा दांडेकर भावुक होते. रिया म्हणते, ‘ही रडायला लागली तर मी देखील रडू लागली… माझे आई – वडील देखील म्हणत होते, या मुली नसत्या तर आम्ही राहूच शकलो नसतो.. आमच्या घरात मंदिर नाही तर, या मुलींचे फोटो लावायला पाहिजे.’ असं देखील रिया म्हणाली.
सांगायचं झालं तर, 2020 मध्ये अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर रियाला मीडिया ट्रायलला सामोरे जावे लागले होते. सप्टेंबर 2020 मध्ये सुशांतच्या मृत्यूच्या संदर्भात तिला ड्रग्जशी संबंधित प्रकरणात अटक करण्यात आली होती. ऑक्टोबर 2020 मध्ये तिला जामीन मंजूर झाला आणि 2025 मध्ये रिया हिला क्लिटचीट मिळाली.
रिया हिने आता नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. आता अभिनेत्री कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी रिया कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.