आम्ही हतबल होतो… 13 वर्षांनंतर आई – वडिलांचा घटस्फोट, ढसाढसा रडली खासदाराची लेक, बापाच्या दुसऱ्या लग्नानंतर तर…
13 वर्षांनंतर आई - वडिलांचा घटस्फोट झाल्यानंतर खासगाराच्या पहिल्या कुटुंबावर फार वाईट वेळ आलेली... नुकताच खासदाराच्या लेकीने खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे... ज्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

भोजपुरी इंडस्ट्रीचे सुपरस्टार आणि नेते मनोज तिवारी यांची मुलगी रीती तिवारी सध्या ‘बिग बॉस’च्या घरात चर्चेत आहे. शोमध्ये रीतीची गायक काजी तौकीरसोबत भांडणं टोकाला पोहोचत आहे. पण या वादविवादादरम्यान रीती शोमध्ये तिचे वडील मनोज तिवारी यांच्या घटस्फोटावर बोलताना दिसली. सांगायचं झालं तर, रीती हिचे वडील भाजप खासदार देखील आहेत. घटस्फोटानंतर, वडिलांपासून दूर राहावं लागल्याचं सांगत तिने आपले दुःख व्यक्त केलं आणि ती बरीच भावूक झाली. भोजपुरी क्वीन आम्रपाली दुबेजवळ आपल्या मनातील गोष्ट व्यक्त करताना रीतीने सांगितलं की, ती अवघ्या 8 वर्षांची असताना तिचे आई-वडील वेगळे झाले होते. तिचे वडील घर सोडून निघून गेले होते. ती 9 वर्षांची झाल्यावर तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला.
आम्रपालीने नंतर रीतीला विचारलं की, तिच्या वडिलांनी तिच्या कस्टडीसाठी कायदेशीर लढा दिला होता का? यावर रीती म्हणाली— हो, मला वाटतं की माझ्या वडिलांना खूप वेळ अशी आशा होती की ते दोघे पुन्हा एकत्र येतील. पण तिची कस्टडी तिच्या आईला मिळाली होती. वडिलांपासून दूर राहिल्याचा तिच्या मनावर मोठा परिणाम झाला. तिने सांगितलं की, जेव्हा ती तिच्या वडिलांना भेटायची, तेव्हा दोघेही अनेकदा रडायचे. भावूक होत रीती म्हणाली, त्यात आम्ही काहीच करू शकत नव्हतो.
रीतीने सांगितलं की, ती जेव्हाही तिच्या वडिलांना भेटायची, तेव्हा त्यांना इंग्रजी शिकवायची. वडिलांसोबत घालवलेले क्षण आणि त्यांच्यापासून दुरावण्याची वेळ आठवून रीती भावूक झाली आणि तिच्या डोळ्यातून पाणी आलं. त्यानंतर आम्रपालीने रीतीला मिठी मारून शांत केलं. रीतीने तिचे वडील मनोज तिवारी यांच्या दुसऱ्या लग्नावरही चर्चा केली. रीतीने सांगितले की, जेव्हा तिच्या वडिलांच्या आयुष्यात सुरभिची एंट्री झाली, तेव्हा ती तिच्या वडिलांसाठी खूप आनंदी होती.
वडिलांच्या दुसऱ्या लग्नाबद्दल रीती म्हणाली, जेव्हा त्यांच्या आयुष्यात सुरभि आल्या, तेव्हा माझ्यापेक्षा जास्त आनंदी दुसरं कोणीही नव्हतं. मला माझी आई खूप प्रिय आहे, पण ते सुद्धा माझे बाबा आहेत. मनोज तिवारी यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, त्यांनी दोन लग्नं केली आहेत, ज्यापासून त्यांना तीन मुली आहेत. मनोज तिवारी यांचं पहिले लग्न 1999 मध्ये रानी तिवारी यांच्याशी झालं होतं, परंतु जवळपास 12 – 13 वर्षांनंतर दोघे वेगळे झाले. या दोघांना रीती तिवारी नावाची एक मुलगी आहे, जी सध्या ‘बिग बॉस 20’ मध्ये झळकत आहे. मनोज तिवारी यांनी घटस्फोटानंतर मध्ये 2020 सुरभि तिवारी यांच्याशी दुसरे लग्न केले. या लग्नापासून त्यांना दोन मुली आहेत.
