
Bigg Boss Marathi 6: Bigg Boss Marathi 6: ‘बिग बॉस मराठी 6’ शोमधील खेळ आता रंगात आला आहे. टॉप 5 मध्ये जाण्यासाठी प्रत्येक स्पर्धक मेहनत घेत आहे. पॉवर कीमुळे तर अनेकांमध्ये वादाची ठिणगी पडल्याचं देखील दिसलं… सांगायचं झालं तर, गेल्या आठवड्यात बिग बॉसच्या घरात तीन वाईल्ड कार्ड सदस्यांची एन्ट्री झाली. त्यामुळे खेळात एक नवीन ट्विस्ट आला… आता या आठवड्यात घरातून बाहेर कोण जाणार, याच प्रतीक्षेत प्रेक्षक आहेत. यामध्ये रुचिता जामदार हिचं नाव चर्चेत असल्याची माहिती समोर येत आहे. सांगायचं झालं तर, सोशल मीडियावर एक प्रोमो पोस्ट करण्यात आला आहे. ज्यामध्ये रुचिता ओक्साबोक्शी रडताना दिसत आहे. रुचिता जामदारला बिग बॉसच्या घरातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. तब्बल आठ आठवड्यांनी रुचिता बिग बॉस मराठी 6 च्या घरातून बाहेर आली आहे… असं सांगण्यात येत आहे…
नुकताच समोर आलेल्या एका प्रोमोमध्ये अभिनेता रितेश देशमुख अचानक एलिमिनेशनचा धक्का देतो. रितेश म्हणतो, ‘जेव्हा जेव्हा घरात गेमला हलकं घेतलं जातं, तेव्हा मी आणि बिग बॉस अॅक्शन घेतो… त्यामुळे यावेळी होणार आहे, घरातील एलिमिनेशन… घरच्यांची भेट घ्या… स्वतःच्या नावाची पाटी काढा आणि बाहेर या… मी येथे तुमची वाट पाहत आहे…’, रितेश असं म्हणाल्यानंतर रुचिता रडू लागते… सोशल मीडियावर प्रोमो तुफान व्हायरल होत आहे.
व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांना कमेंट करत प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. व्हिडीओवर कमेंट करत एक नेटकरी म्हणला, ‘रुचिता सिक्रेट रुममध्ये आहे.’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘रुचिता नाही सागर घराबाहेर गेला आहे…’, ‘रुचिता आणि विशाल यांच्यामुळे पूर्ण बिग बॉसचं घर आहे…’ असं देखील एक नेटकरी म्हणाला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त बिग बॉसच्या घरातील कोणाचा प्रवास संपला याची चर्चा रंगली आहे.
प्रोमोमध्ये घरातील वातावरण खूपच भावूक झाल्याचं चित्र दिसत आहे… विशाल आणि रुचिता दोघेही रडताना दिसत आहेत… पण नक्की कोण घराबाहेर आलं याची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. त्यामुळे येत्या एपिसोडमध्ये नेमकं काय घडणार आणि रुचिता घराबाहेर पडली आहे की, सागर? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.