AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तू थोडं… साराचं वय वाढलं, सानियानं दिला खास सल्ला, तो व्हिडीओ तुफान व्हायरल!

लवकरच अर्जुन तेंडुलकर-सानिया चंडोक लग्नबंधनात अडकणार असल्याचे बोलले जात आहे. या वृत्ताबाबत तेंडुलकर तसेच चंडोक कुटुंबाने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र अर्जुन-सानिया यांच्या साखरपुड्याचे फोटो समोर आल्यानंतर आता सानिया आणि सारा यांच्यातील असलेल्या बाँडिंगचीही विशेष चर्चा होत आहे. दरम्यान, सध्या एक व्हिडीओ समोर आला असून सानिया साराला एक सल्ला देताना दिसत आहे.

तू थोडं... साराचं वय वाढलं, सानियानं दिला खास सल्ला, तो व्हिडीओ तुफान व्हायरल!
saaniya chandhok and sara tendulkar
| Updated on: Aug 18, 2025 | 8:11 PM
Share

Sara Tendulkar And Saaniya Chandhok : महान क्रिकेटर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचा नुकताच साखरपुडा झाला आहे. अर्जुनची बहीण सारा तेंडुलकर हिची मैत्रीण सानिया चंडोक अर्जुनची होणारी बायको आहे. लवकरच ते लग्नबंधनात अडकणार असल्याचे बोलले जात आहे. या वृत्ताबाबत तेंडुलकर तसेच चंडोक कुटुंबाने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र अर्जुन-सानिया यांच्या साखरपुड्याचे फोटो समोर आल्यानंतर आता सानिया आणि सारा यांच्यातील असलेल्या बाँडिंगचीही विशेष चर्चा होत आहे. दरम्यान, सध्या एक व्हिडीओ समोर आला असून सानिया साराला एक सल्ला देताना दिसत आहे.

व्हिडीओत काय आहे?

सारा तेंडुलकरचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सानियाने साराला एक खास सल्ला दिलाय. विशेष म्हणजे या व्हिडीओत सचिन तेंडुलकर, अंजली तेंडुलकर, अर्जुन तेंडुलकरही दिसत आहेत. हा व्हिडीओ गेल्या वर्षाचा आहे. मात्र या व्हिडीओत सानिया दिसत असल्याने तो नव्याने व्हायरल होत आहे. सारा तेंडुलकर या सर्वांनाच एक सल्ला मागताना दिसत आहे.

साराने मागितला सर्वांनाच सल्ला

सध्या समोर आलेल्या व्हिडीओ सारा तेंडुलकरच्या इन्स्टाग्राम खात्यावर अपलोड करण्यात आलेला आहे. या व्हिडीओत ती अर्जुन तेंडुलकर, सचिन-अंजली तेंडुलकर, सानिया चंडोक यांना मी लवकरच 27 व्या वर्षात पदार्पण करणार आहे. त्यामुळे मला एक सल्ला द्या, अशी सारा या सर्वांना विचारणा करताना दिसत आहे. याच व्हिडीओत सानियाने साराला एक खास सल्ला दिलाय.

सानियाने साराला नेमका काय सल्ला दिला?

27 ऑक्टोबर रोजी साराचा वाढदिवस असतो. यावेळी साराने विचारलेल्या प्रश्नांची सर्वांनीच वेगवेगळी उत्तरे दिली आहेत. सानियाने मात्र साराला जास्त तणावात राहू नको. टेन्शन घेऊन नको, असा सल्ला दिलाय. तसेच जीवनाचा आनंद घे, असंही सानियाने साराला सांगितलंय. तर अंजली तेंडुलकर यांनी कधीकधी तणावात राहणे चांगले असते. कारण नंतर सर्वकाही ठिकठाक होतं, असं म्हणत साराला काळजी घेण्याचा सल्ला दिलाय. दरम्यान, या व्हिडीओची सध्या सगळीकडेच खास चर्चा होत आहे. या व्हिडीओला लोक भरभरून लाईक करत आहेत.

Follow Us
माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपके
Exclusive | माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपकेने सांगितलं जंतर-मंतरवर पहिल्या दिवशी काय घडलं?
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; देवस्थानात...
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; पाणी देवस्थानात शिरल्यानंतरही भक्तिभावाने महाआरती
भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात, नवी माहिती...
Ashok Kharat | भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात...नेमकी नवी माहिती काय?
धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले, तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने...
Rain Update | धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले तरी... तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने विसर्ग सुरु
मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन...; साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
Ameet Satam on Raj Thackeray | मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन म्हणत...; अमित साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
Raj Thackeray | NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच...
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच... भाजपच्या बड्या नेत्याने सांगितली खदखद
सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
Sada Sarvankar On Raj Thackeray | 18 कोटींच्या चोरीचा दावा चुकीचा?; सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
Abhijeet Dipake | अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही...
Sonam Wangchuk | आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही; सरकारला सोनम वांगचुक यांचा थेट इशारा