
Sara Tendulkar And Saaniya Chandhok : महान क्रिकेटर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचा नुकताच साखरपुडा झाला आहे. अर्जुनची बहीण सारा तेंडुलकर हिची मैत्रीण सानिया चंडोक अर्जुनची होणारी बायको आहे. लवकरच ते लग्नबंधनात अडकणार असल्याचे बोलले जात आहे. या वृत्ताबाबत तेंडुलकर तसेच चंडोक कुटुंबाने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र अर्जुन-सानिया यांच्या साखरपुड्याचे फोटो समोर आल्यानंतर आता सानिया आणि सारा यांच्यातील असलेल्या बाँडिंगचीही विशेष चर्चा होत आहे. दरम्यान, सध्या एक व्हिडीओ समोर आला असून सानिया साराला एक सल्ला देताना दिसत आहे.
सारा तेंडुलकरचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सानियाने साराला एक खास सल्ला दिलाय. विशेष म्हणजे या व्हिडीओत सचिन तेंडुलकर, अंजली तेंडुलकर, अर्जुन तेंडुलकरही दिसत आहेत. हा व्हिडीओ गेल्या वर्षाचा आहे. मात्र या व्हिडीओत सानिया दिसत असल्याने तो नव्याने व्हायरल होत आहे. सारा तेंडुलकर या सर्वांनाच एक सल्ला मागताना दिसत आहे.
सध्या समोर आलेल्या व्हिडीओ सारा तेंडुलकरच्या इन्स्टाग्राम खात्यावर अपलोड करण्यात आलेला आहे. या व्हिडीओत ती अर्जुन तेंडुलकर, सचिन-अंजली तेंडुलकर, सानिया चंडोक यांना मी लवकरच 27 व्या वर्षात पदार्पण करणार आहे. त्यामुळे मला एक सल्ला द्या, अशी सारा या सर्वांना विचारणा करताना दिसत आहे. याच व्हिडीओत सानियाने साराला एक खास सल्ला दिलाय.
27 ऑक्टोबर रोजी साराचा वाढदिवस असतो. यावेळी साराने विचारलेल्या प्रश्नांची सर्वांनीच वेगवेगळी उत्तरे दिली आहेत. सानियाने मात्र साराला जास्त तणावात राहू नको. टेन्शन घेऊन नको, असा सल्ला दिलाय. तसेच जीवनाचा आनंद घे, असंही सानियाने साराला सांगितलंय. तर अंजली तेंडुलकर यांनी कधीकधी तणावात राहणे चांगले असते. कारण नंतर सर्वकाही ठिकठाक होतं, असं म्हणत साराला काळजी घेण्याचा सल्ला दिलाय. दरम्यान, या व्हिडीओची सध्या सगळीकडेच खास चर्चा होत आहे. या व्हिडीओला लोक भरभरून लाईक करत आहेत.