Sachin Pilgaonkar: कायम लक्षात राहणारं अफेअर… सुप्रिया आधी या सुपरस्टारच्या पत्नीच्या प्रेमात होते सचिन पिळगावकर

Sachin Pilgaonkar: सचिन पिळगावकर हे मराठी तसेच बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय नाव आहे. त्यांनी सु्प्रियाशी लग्न करण्यापूर्वी एका अभिनेत्रीच्या प्रेमात असल्याचे सांगितले होते. ती अभिनेत्री एका सुपरस्टराची पत्नी आहे.

Sachin Pilgaonkar: कायम लक्षात राहणारं अफेअर... सुप्रिया आधी या सुपरस्टारच्या पत्नीच्या प्रेमात होते सचिन पिळगावकर
Sachin pilgaonkar
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Nov 19, 2026 | 11:04 AM

सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर हे मराठी इंडस्ट्रीतले एक आदर्श कपल म्हणून ओळखले जातात. या दोघांची लव स्टोरी आपण अनेकदा एकली असेल, पण तुम्हाला माहित आहे का सुप्रिया आधी सचिनजी एका अभिनेत्रींच्या प्रेमात आखंड बुडाले होते. ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून कमल हसनची पूर्वाश्रमीची पत्नी आणि सचिनजी यांची सहकलाकार सारिका या होत्या. १९७५ साली ‘गीत गाता चल’च्या सेटवर सचिन आणि सारिकाची भेट झाली, त्यावेळी सचिनजी केवळ १८ वर्षांचे होते.

फार कमी जणांना माहित असेल कि सारिका या मूळच्या मराठी आहेत. सारिकाचे आडनाव ठाकूर, तिची आई राजपूत होती आणि वडील सावंत. सारिकाचे आई-वडील एकत्र राहत नव्हते ती लहान असतानाच आई तिला घेऊन बाहेर पडली होती.

Loading...

‘गीत गाता चल’मधील त्यांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. सचिन-सारिका ही जोडी धर्मेंद्र-हेमामालिनीच्या जोडी इतकीच लोकप्रिय झाली. दोघांनी एकत्र सुमारे आठ-दहा चित्रपट केले. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघं एकमेकांच्या प्रेमात कधी पडले, हे त्यांना कळलंच नाही. या यशाच्या लाटेवर सचिनने राजबाबूंना एक नवीन चित्रपटाची कल्पना सुचवली, जी ‘लव्ह स्टोरी’ या इंग्रजी चित्रपटावर आधारित होती. या चित्रपटात एका तरुण जोडप्याचं प्रेम, त्यांचा लग्नाचा निर्णय आणि नायिकेला कर्करोग झाल्याचं कळून तिचा मृत्यू होण्याची हृदयस्पर्शी कथा होती. सचिनला ही कथा इतकी आवडली की त्याने राजबाबूंना तशीच कथा मराठी चित्रपटात उतरवण्याची विनंती केली. राजबाबूंनी या कल्पनेला होकार देताना सांगितलं, “ही कथा चांगली आहे, पण ती ‘हिरोइन ओरिएन्टेड’ असेल.” सचिनने लगेच उत्तर दिलं, “होऊ दे ना! काम तर सारिकाच करणार आहे. मग काय हरकत आहे?” त्यांच्या या आत्मविश्वासामुळे ‘अखियों के झरोकों से’ च्या निर्मितीला सुरुवात झाली.

मात्र, याच काळात सचिन आणि सारिकाच्या नात्यामध्ये अडथळे येऊ लागले. त्याच वेळी ‘गोपालकृष्ण’ या दुसऱ्या चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं, ज्यामध्ये दोघंही काम करत होते. या चित्रपटाचं काही शूटिंग आणि एका गाण्याचं चित्रीकरण पूर्ण झालं होतं. पण सेटवर काहीतरी गडबड असल्याचं सचिनच्या लक्षात येत होतं, तरी त्याचं नेमकं कारण त्यांना समजत नव्हतं. प्रत्यक्षात, सारिकाच्या आईला सचिन-सारिकाचं नातं मान्य नव्हतं. त्या दोघांच्या जवळीकतेमुळे सारिकाच्या करिअरवर परिणाम होईल, असं तिच्या आईचं मत होतं. याच कारणाने तिने ‘राजश्री प्रॉडक्शन्स’च्या ऑफिसमध्ये जाऊन सचिन यांना चित्रपटातून काढण्याची मागणी केली. त्या म्हणाल्या, “आम्हाला सचिनसोबत काम करायचं नाही. तुम्ही त्याला बदला.”

राजबाबूंनी या मागणीला स्पष्ट नकार दिला. ते म्हणाले, “सचिनजींबद्दल कुणीही तक्रार केलेली नाही. जर सारिकाला काम करायचं नसेल, तर ती सांगू शकते. आम्ही दुसरी नायिका घेऊ.” यावर सारिकाच्या आईने ठामपणे सांगितलं, “मग दुसरी नायिका घ्या. आम्हाला काम करायचं नाही.” या मतभेदांमुळे सारिकाला ‘गोपालकृष्ण’मधून बाहेर पडावं लागलं. सचिन यांनी या प्रकरणात कोणतीही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला नाही. त्याने राजबाबूंना सांगितलं, “सारिकाला चित्रपट सोडायचा असेल, तर माझी हरकत नाही. पण री-शूटमुळे खर्च वाढेल, हे लक्षात ठेवा.” सारिकाच्या जागी झरीना वहाबची निवड झाली, पण ‘गोपालकृष्ण’ हा चित्रपट फारसा यशस्वी झाला नाही.

दरम्यान, ‘अखियों के झरोकों से’चं काम पुढे सरकत होतं. या चित्रपटात रंजिताने मुख्य भूमिका साकारली. हा चित्रपट ‘गोपालकृष्ण’च्या आधी प्रदर्शित झाला आणि प्रचंड यशस्वी ठरला. प्रेक्षकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला. मात्र, या यशाच्या आनंदातही सचिन आणि सारिकाचं नातं वेगळं होण्याच्या मार्गावर होतं. सारिकाच्या आईच्या विरोधामुळे आणि राजश्री प्रॉडक्शन्सशी झालेल्या मतभेदांमुळे त्यांचं व्यावसायिक आणि वैयक्तिक नातं तुटलं. तरीही, सचिन आणि सारिकाने त्यांच्यातील आदर आणि मैत्री कायम ठेवली, जी पुढील काळातही टिकून राहिली.

सचिनजी आपल्या या नात्याबद्दल बोलताना म्हणतात की, सारिका आणि माझ्यात वरवरचं प्रेम किंवा आकर्षण नव्हते. आमचं एकमेकांवर खरंखुरं प्रेम होतं. It was an affair to remember, तरीही आमच्यात शारीरिक जवळीक कधीच नव्हती. याचे मूळ कारण हे आम्हाला एकमेकांशी लग्न करायचं होतं. आमचं नातं हे एकमेकांबद्दलच्या आदरावर प्रेमावर उभं होते फक्त तारुण्यातील आकर्षणावर नव्हे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us