तिची प्रतिष्ठा, गोपनीयता…सचिन सिंघवी लैंगिक शोषणात अडकले, 20 वर्षाीय तरुणीच्या वकिलाची मोठी माहिती!

गायक, संगीतकार सचिन संघवी याच्यावर एका 20 वर्षीय तरुणीने लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. याच प्रकरणात पीडित तरुणीच्या वकिलांनी समोर येत महत्त्वाची माहिती दिली आहे.

तिची प्रतिष्ठा, गोपनीयता...सचिन सिंघवी लैंगिक शोषणात अडकले, 20 वर्षाीय तरुणीच्या वकिलाची मोठी माहिती!
sachin sanghvi
| Updated on: Oct 28, 2025 | 8:43 PM

Sachin Sanghvi : गायक आणि संगीतकार सचिन संघवी एका लैंगिक अत्याचार प्रकरणात अडकलेला आहे. एका 20 वर्षीय तरुणीने त्यांच्यावर हे आरोप केलेले आहेत. सचिन संघवी यांनी स्त्री-2, भेडिया यासारख्या चित्रपटांना सुपरहिट गाणे दिले आहेत. दरम्यान या सचिन संघवी यांच्यावर आरोपांप्रकरणी आता मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील तक्रारी तरुणीच्या वतीने तिच्या वकिलांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. तसेच माध्यमांनाही एक आवाहन केले आहे.

पीडितेच्या वकिलांनी काय आवाहन केले

या कथित अत्याचारप्रकरणी सचिन सिंघवी यांना जामीन मिळालेला आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. याच प्रकरणावर कथित पीडितेचे वकील निशांत जौहरी यांनी एक निवेदन जारी केले आहे. सोबतच त्यांनी माध्यमांना या प्रकरणी रिपोर्टिंग करताना थोडी काळजी घ्यावी, असेही सांगितले आहे. या घटनेत माझ्या अशिलाला न्याय देण्यासाठी मी सर्व पर्यायांचा अवलंब करणार आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे या प्रकरणात सध्यातरी अधिक बोलणे योग्य होणार नाही, असे जौहरी यांनी म्हटले आहे.

“या प्रकरणातील पीडितेची प्रतिष्ठा, गोपनीयतेची काळजी घ्यायला हवी. ही बाब लक्षात घेऊनच संवेदनशीलपणे या प्रकरणाचे रिपोर्टिंग करावे,” असे आवाहनही त्यांनी माध्यमांना केले आहे.

नेमके प्रकरण काय आहे?

आरोपी सचिन यांनी एका तरुणीला म्युझिक अल्बममध्ये काम देतो असे सांगितले. नंतर तिच्यासोबत लग्न करण्याचेही आश्वासन देऊन तिचे शारीरिक शोषण केले. या दोघांची फेब्रवारी 2024 मध्ये पहिल्यांदाच भेट झाली होती, असा दावा करण्यात आला आहे.

स्टुडिओत बोलावले आणि वेळोवेळी…

सचिन यांना पीडित तरुणीने अगोदर इन्स्टाग्रामवर मेसेज पाठवला होता. पुढे सचिन यांनी या तरुणीला म्युझिक अल्बममध्ये काम देण्याचे आश्वासन दिले होते. सचिन यांनी त्या तरुणीला स्टुडिओत बोलून तिच्यापुढे लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. नंतर वेळोवेळी तिचे लैंगिक शोषण करण्यात आले, असा दावा करण्यात आला आहे.

सचिन संघवी यांनी आरोप फेटाळले

दरम्यान, या प्रकरमात सचिन संघवी यांची बाजू वकिल आदित्य मिठे हे मांडत आहेत. त्यांनी सचिन यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप खोटे आहेत, असा दावा केलाय. त्यामुळे आता या प्रकरणात पुढे नेमके काय घडणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.