सचिन तेंडुलकर यांची लेक करते आजोबांचं स्वप्न पूर्ण, मुलांच्या शिक्षणासाठी सारा म्हणते…

Sara Tendulkar | आजोबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सारा तेंडुलकर हिची मुख्य भूमिका, गावातील मुलांना शिकवलं आणि म्हणाली..., जिंकलं अनेकांचं मन, सोशल मीडियावर सध्या सारा तेंडुलकर हिने पोस्ट केलेले फोटो व्हायरल होत आहेत. फोटोमध्ये सारा हिच्यासोबत आई अंजली तेंडुलकर देखील आहेत.

सचिन तेंडुलकर यांची लेक करते आजोबांचं स्वप्न पूर्ण, मुलांच्या शिक्षणासाठी सारा म्हणते...
| Updated on: Jun 18, 2024 | 10:25 AM

क्रिकेटचे देव सचिन तेंडुलकर यांची लेक सारा तेंडुलकर कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. पण आता सारा हिने अनेकांचं मन जिंकलं आहे. सारा हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहे. ज्यामध्ये सारा मुलांना शिकवताना आणि त्यांच्यासोबत गप्पा मारताना दिसत आहे. सारा हिच्यासोबत आई अंजली तेंडुलकर देखील दिसत आहेत. सध्या सोशल मीडियावर फक्त आणि फक्त सारा हिने पोस्ट केलेल्या फोटोंची चर्चा रंगली आहे. सांगायचं झालं तर, सारा वडील सचिन तेंडुलकर फाउंडेशनसाठी काम करत असते.

समाजसेवेअंतर्गत सचिन तेंडुलकर फाउंडेशन देशाच्या विविध भागात वेगवेगळ्या उद्देशाने काम करत आहे. सचिन व्यतिरिक्त त्याची पत्नी अंजली, मुलगी सारा आणि मुलगा अर्जुन हे देखील आपला अमूल्य वेळ काढून समाजसेवा करत असतात. सारा हिने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये सारा आणि तिची आई मुलांना शिकवताना दिसत आहे.

 

 

एका फोटोमध्ये अंजली यांनी एक लहान बाळाला मांडीवर देखील घेतलं आहे. सांगायचं झालं तर, साराने मुलांच्या शिक्षणासाठी एक पाऊल पुढे टाकत आजोबांचं स्वप्न पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये सारा म्हणाली, ‘आजोबांसोबत माझा फक्त एक वर्षाचा सहवास होता. पण त्यांना शिक्षणाची जी आवड होती, त्या गोष्टी ऐकत मी मोठी झाली.’

‘शिक्षणामुळे आपल्यासाठी अनेक दरवाजे आणि संधी उपलब्ध होतात.. असं ते प्राध्यापक म्हणून कायम सांगायचे. मध्य प्रदेशातील सिहोर जिल्ह्यातील सेवा कुटीरला भेट दिल्यामुळे त्यांचा काय अर्थ आहे याची जाणीव मला झाली. ‘

पुढे सारा म्हणाली, ‘शिक्षणा शिवाय STF च्या वतीने सेवा कटीरमधील मुलांना दोन वेळचं पौष्टिक भोजन देखील दिलं जातं आणि स्थानिक लोकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण केल्या जातात. STF चा भाग असल्याचा मला अभिमान आहे..’ सध्या सर्वत्र सारा हिच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.

सचिन तेंडुलकर फाऊंडेशनने सिहोर जिल्ह्यातील नयापुरा, खापा, बेलपाटी, जामुंझील आणि सेवानिया दत्तक घेतले आहेत. यामध्ये 3 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांना शिक्षण, भोजन आणि इतर सुविधा पुरविल्या जातात.