Sai Pallavi : काश्मिरी पंडितांबाबत वादग्रस्त व्यक्तव्यावर साई पल्लवीचं स्पष्टीकरण, म्हणाली, ‘माझं मत चुकीच्या पद्धतीने घेतलं गेलं…’

एका मुलाखतीत तिने काश्मिरी पंडितांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झालाय. महत्वाची बाब म्हणजे तिच्या वक्तव्यानंतर पोलीस तक्रारही दाखल झाली आहे. आता या सगळ्या वादानंतर साई पल्लवीने मौन सोडत आपली बाजू मांडली आहे.

Sai Pallavi : काश्मिरी पंडितांबाबत वादग्रस्त व्यक्तव्यावर साई पल्लवीचं स्पष्टीकरण, म्हणाली, माझं मत चुकीच्या पद्धतीने घेतलं गेलं...
साई पल्लवी, अभिनेत्री
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 18, 2022 | 10:38 PM

मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटातील सुप्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवी (Sai Pallavi) आजकाल वादात अडकल्याचं पाहायला मिळत आहे. साई पल्लवी सध्या आपला आगामी चित्रपट विरता पर्वम (Virata Parvam) या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. चित्रपटाच्या प्रमोशनवेळी एका मुलाखतीत तिने काश्मिरी पंडितांबाबत (Kashmiri Pandits) केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झालाय. महत्वाची बाब म्हणजे तिच्या वक्तव्यानंतर पोलीस तक्रारही दाखल झाली आहे. आता या सगळ्या वादानंतर साई पल्लवीने मौन सोडत आपली बाजू मांडली आहे.

साई पल्लवीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओद्वारे मुलाखतीत केलेल्या वक्तव्याबाबत तिने आपली बाजू मांडली. आपलं वक्तव्य चुकीच्या पद्धतीने प्रसिद्ध करण्यात आलं. आपण खूप न्यूट्रल होऊ प्रश्नाचं उत्तर दिलं होतं. मात्र, ते उत्तर एका भलत्याच दिशेनं नेण्यात आलं. या सगळ्या प्रकारामुळे मागील काही दिवसांत आपण खूप दु:खी असल्याचं तिने या व्हिडीओत म्हटलंय.

साई पल्लवीचं स्पष्टीकरण काय?

साई पल्लवीने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत स्पष्टीकरण दिलं आहे. या व्हिडीओत तीने म्हटलं आहे की, असं पहिल्यांदाच होत आहे की मी तुम्हा सर्वांशी संवाद साधतेय. मी कायमच मनात जे असेल तर बोलते. मला माहिती आहे की मी माझी बाजू मांडण्यास उशीर केलाय, पण मला माफ करा. माझं मत चुकीच्या पद्धतीने समोर ठेवण्यात आलं. मी तिथे फक्त इतकंच सांगू इच्छित होते की धर्माच्या नावाने कोणताही वाद चुकीचा आहे. मी एक न्यूट्रल व्यक्ती आहे. मला स्वत:ला शॉक बसला की जे मी बोलले ते चुकीच्या पद्धतीने घेतलं आणि मांडलं गेलं. मुलाखतीत अनेक बाबी चुकीच्या प्रकारे घेण्यात आल्या.

साई पल्लवीच्या कोणत्या वक्तव्यामुळे वादाची ठिणगी?

“मला लहानपणापासूनच हे शिकवलं गेलंय की तू चांगली व्यक्ती होण्याचा प्रयत्न कर. कोणी लहान, कोणी मोठा असं काही नसतं. अशाच वातावरणात मी लहानाची मोठी झाले. डावे आणि उजवे यांच्याविषयी मी फार ऐकलंय, पण यात कोण बरोबर आणि कोण चुकीचं हे सांगता येणार नाही. द काश्मीर फाईल्स या चित्रपटात काश्मिरी पंडितांवर झालेला अन्याय आणि नरसंहार दाखवण्यात आला. धार्मिक वादाबद्दल बोलायचं झाल्यास, गाईंची तस्करी करून घेऊन जाणाऱ्या मुस्लीम चालकाला मारण्यात आलं आणि त्यावेळी जय श्री रामच्या घोषणा दिल्या गेल्या. मग तेव्हा जे घडलं आणि आता जे घडतंय त्यात काय फरक आहे?”, असं साई पल्लवी एका मुलाखतीत म्हणाली. तिच्या याच वक्तव्यावरुन वादाला तोंड फुटलं.