Saif Ali Khan : तैमुरला धर्माबद्दल काय शिकवण देतो, त्या बद्दल प्रथमच सैफ अली खानकडून खुलासा

Saif Ali Khan : सैफ अली खानच्या अभिनया इतकीच त्याच्या व्यक्तीगत आयुष्याची सुद्धा चर्चा होते. याचं कारण आहे, त्याची कौटुंबिक, धार्मिक पार्श्वभूमी. सैफ अली खान नुकताच मुलांना धर्माबद्दल काय शिकवण देतो, त्या बद्दल व्यक्त झाला. तैमुर आणि जेहच्या धार्मिक शिकवणीबद्दल त्याने महत्वाची माहिती दिली.

Saif Ali Khan : तैमुरला धर्माबद्दल काय शिकवण देतो, त्या बद्दल प्रथमच सैफ अली खानकडून खुलासा
Saif ali khan-Kareena Kapoor
| Updated on: Jun 29, 2026 | 7:48 AM

अभिनेता सैफ अली खानचा विषय आला की, अभिनय, चित्रपट यांच्याबरोबरीने त्याचं व्यक्तिगत आयुष्यही चर्चेचा विषय बनतं. याचं कारण आहे, सैफ अली खानची कौटुंबिक पार्श्वभूमी. सैफ अली खान प्रसिद्ध क्रिकेटपटू मन्सूर अली खान पतौडी आणि अभिनेत्री शर्मिला टागोर यांचा मुलगा आहे. 60-70 च्या दशकात त्या काळात मन्सूर अली खान पतौडी आणि शर्मिला टागोर यांनी आंतरधर्मीय विवाह करणं ही खूप मोठी बाब होती. स्वत: सैफची दोन लग्नही आंतरधर्मीय विवाहामध्येच मोडतात. अमृता सिंह त्यानंतर करीना कपूर या सैफ अली खानच्या दोन्ही पत्नी हिंदू आहेत. सैफ अली खान मुलांच्या धर्माबद्दलच्या शिकवणीवर व्यक्त झाला. तैमूर आणि जेह दोन्ही मुलांना धर्मांकडे सर्वसमावेशकतेच्या दृष्टीकोनातून पहायला शिकवतो असं सैफने सांगितलं. धर्मावरचा विश्वास हा नियमित कौटुंबिक चर्चेचा भाग असल्याचं सैफने मान्य केलं.

‘वी द वुमन’ या लंडनच्या आवृत्तीच्या कार्यक्रमात सैफ अली खान बोलत होता. स्वत: खूप धार्मिक नसल्याचं त्याने मान्य केलं. मुलांसोबत धर्माच्या विषयावर बोलायला आवडतं असल्याचं सैफने सांगितलं. “मला मुलांसोबत या विषयावर बोलायला आवडतं. मी स्वत: खूप धार्मिक नाहीय. जे मला माझ्या आईने शिकवलं, ते मी माझ्या मुलांना शिकवतो. एक देव आहे, त्याची अनेक नावं आहेत. तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी देवाची पूजा करता. तुमचा धर्म जर प्रेम आणि एखाद्याला माफ करायला शिकवतो तर तेच महत्वाचं आहे” असं सैफ म्हणाला.

मी शाळेत दुसऱ्या धर्माचा आहे असं सांगून पळून जायचो

सैफने स्वत:च्या बालपणाबद्दलही सांगितलं. “ख्रिश्नच शाळेत शिकताना मला विविध धर्मांबद्दल समजलं होतं” असं सैफ म्हणाला.”दिवसाची सुरुवात प्रार्थना सभेने व्हायची अशा शाळांमधल्या चर्चेसमध्ये मी मोठा झालो. मी शाळेत दुसऱ्या धर्माचा आहे असं सांगून पळून जायचो” असं सैफने हसून सांगितलं. “माझं थोडं संगोपन ख्रिश्चन पद्धतीने झालय. मुलं इतर धर्माच्या सुद्धा प्रार्थना करायचे. दिवाळी इतकाच नाताळ साजरा करायचे. अशा पद्धतीने मी लहानाचा मोठा झालोय. मी कधी याचा फार विचार केला नाही” असं सैफ अली खान बोलला.

Follow Us