AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सैफ अली खानची दोन लग्न पण 50 वर्षीय बहीण आजही अविवाहित; स्वत:च सांगितलं खरं कारण

सैफ अली खानची बहीण नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या खासगी आयुष्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. आजवर लग्न का केलं नाही, याचं कारणही तिन सांगितलं आहे.

सैफ अली खानची दोन लग्न पण 50 वर्षीय बहीण आजही अविवाहित; स्वत:च सांगितलं खरं कारण
Saif Ali KhanImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 12, 2026 | 1:14 PM
Share

बॉलिवूडमध्ये सैफ अली खान आणि सोहा अली खान यांच्या वैयक्तिक आयुष्याची नेहमीच चर्चा होत असते. मात्र, त्यांची मोठी बहीण सबा अली पटौदी नेहमीच प्रसिद्धीपासून दूर राहिली आहे. आता वयाच्या 50 व्या वर्षी सबाने तिच्या लग्नाबद्दल आणि अविवाहित राहण्यामागच्या कारणांबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केलं आहे. ‘मला माझ्या इच्छेने अविवाहित राहायचं नव्हतं. माझीही आयुष्यात जोडीदार असावा, अशी इच्छा होती,’ अशा आशयाचं वक्तव्य करत तिने अनेक वर्षांपासून मनात असलेली भावना व्यक्त केली. योग्य जोडीदार न मिळाल्यामुळे लग्न झालं नाही, असंही तिने स्पष्ट केलं.

सबा पटौदीने ‘शी द पीपल’ला दिलेल्या मुलाखतीत आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. “अविवाहित राहण्याचा निर्णय मी जाणीवपूर्वक घेतलेला नाही. मलाही लग्न करायचं होतं आणि आयुष्यात एक जोडीदार असावा, असं वाटत होतं. मात्र, ज्या व्यक्तीसोबत संपूर्ण आयुष्य घालवता येईल, अशी योग्य व्यक्ती मला आजवर भेटली नाही,” असं ती म्हणाली. सबा आजही लग्नासाठी तयार आहे. मात्र, केवळ लग्न करायचं म्हणून कोणाशीही तडजोड करण्याची तिची तयारी नाही. नात्यामध्ये परस्पर आदर, काळजी आणि विश्वास असणं तिच्यासाठी महत्त्वाचं आहे. केवळ आकर्षणापेक्षा मैत्रीचं नातं अधिक महत्त्वाचं असल्याचंही तिने सांगितलं.

पहा फोटो-

View this post on Instagram

A post shared by Saba Pataudi (@sabapataudi)

सबा पटौदीने स्वतंत्र आणि खंबीर महिलांच्या नातेसंबंधांबद्दलही आपलं मत मांडलं. तिच्या मते, आजही काही पुरुषांना आत्मनिर्भर आणि स्वतःची मतं असणाऱ्या महिलांना पूर्णपणे स्वीकारणं कठीण जातं. त्यामुळे अशा महिलांना योग्य जोडीदार शोधताना अडचणी येऊ शकतात. सबा स्वतःच्या आयुष्यात आनंदी आहे. एकटं राहणं आणि एकटेपणा जाणवणं या दोन वेगळ्या गोष्टी असल्याचं तिने स्पष्ट केलं. तिला स्वतःसोबत वेळ घालवायला आवडतो.

सबा ही ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर आणि दिवंगत क्रिकेटपटू मन्सूर अली खान पटौदी यांची मुलगी आहे. सैफ अली खान आणि सोहा अली खान यांची बहीण असलेली सबा चित्रपटसृष्टीपासून दूर राहिली. ती ज्वेलरी डिझायनर असून औकाफ-ए-शाही या संस्थेची मुख्य विश्वस्त म्हणूनही जबाबदारी सांभाळते.

Follow Us
भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश... आंदोलनावरून राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut : भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश अन्... दिल्लीतील आंदोलनावरून संजय राऊतांचा गंभीर आरोप
संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा..
Devendra Fadnavis : संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा विरोधकांना सवाल
सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
CJP Protest : सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार....
Raj Thackeray : MNS : राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसेचा पुढाकार
वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित...
CM Devendra Fadnavis : वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित; निमंत्रण नव्हतं की....
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?
इंडिया आघाडीचा आज कोर्टावर मोर्चा, आजही राहुल गांधी...
Rahul Gandhi | इंडिया आघाडीचा आज कोर्टावर मोर्चा, आजही राहुल गांधी...
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं आवाहन, म्हणाले
Devendra Fadnavis : शेतकऱ्यांनो, गोधन विकू नका; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं आवाहन, पुढे म्हणाले...
इंडिया आघाडीचा मोर्चा; दिल्लीतील ते 6 मेट्रो स्टेशन आज बंद
Delhi Protest : ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा मोर्चा; दिल्लीतील ते 6 मेट्रो स्टेशन आज बंद
ठाकरेंच्या अडचणी वाढणार? जुनियर ठाकरेंसह 300 आंदोलकांवर....
Thackeray Bandhu : ज्ञानेश कुमार हटाव आंदोलनानंतर ठाकरेंच्या अडचणी वाढणार? जुनियर ठाकरेंसह 300 आंदोलकांवर....