सैफच्या मुलाकडे तरुणीची अशी मागणी, थेट म्हणाला ‘नो’; व्हिडीओ व्हायरल

सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका चाहतीने त्याच्याकडे अशी मागणी केली, की त्यावर इब्राहिमने तिला थेट 'नो' असं उत्तर दिलं. नेमकं काय घडलं, वाचा..

सैफच्या मुलाकडे तरुणीची अशी मागणी, थेट म्हणाला नो; व्हिडीओ व्हायरल
इब्राहिम अली खान, चाहती
Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 02, 2026 | 3:53 PM

अभिनेता सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान याने ‘नादानियाँ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. परंतु इब्राहिम त्याच्या खासगी आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असतो. अशातच त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक चाहती त्याच्यासोबत आधी सेल्फी क्लिक करते. त्यानंतर ती इब्राहिमकडे अशी मागणी करते, जे ऐकून तो थेट तिला ‘नो’ असं उत्तर देतो. त्याच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. इब्राहिम बॉलिवूड पदार्पण करण्याच्या आधीपासूनच त्याची ‘फीमेल फॅन फॉलोइंग’ खूप आहे. त्यामुळे तो जिमबाहेर, एअरपोर्टवर किंवा इतर कुठेही दिसला तरी त्याच्यासोबत फोटो क्लिक करण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक असतात.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये पहायला मिळतंय की, एक चाहती आधी इब्राहिमसोबत फोटो क्लिक करते. त्यानंतर ती त्याला गालावर किस करायला सांगते. त्यावर इब्राहिम तिला स्पष्ट नकार देत “नाही, मी असाच ठीक आहे, थँक यू” म्हणतो. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ‘अशी मागणी कोण करतं? हेच एखाद्या अभिनेत्रीसोबत घडलं असतं तर’, असा सवाल एकाने केला. तर ‘नंतर तिनेच आरोप केले असते की बळजबरीने किस केलं, बिचाऱ्याचं करिअर सुरू होण्याआधीच संपलं असतं’, असं दुसऱ्या युजरने म्हटलं. तर ‘छपरी चाहते’ अशा शब्दांत काहींनी टीकासुद्धा केली. ‘हा तर छळ आहे. सेलिब्रिटी आहे म्हणून त्याला काहीही करायला सांगू शकत नाही, हे कसले चाहते’, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

इब्राहिमच्या करिअरबद्दल बोलायचं झालं तर त्याने अभिनेत्री खुशी कपूरसोबत ‘नादानियाँ’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. त्यानंतर तो काजोल आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्या ‘सरजमीन’मध्ये झळकला. परंतु हे दोन्ही चित्रपट प्रेक्षक-समिक्षकांच्या विशेष पसंतीस उतरले नाहीत. इब्राहिम लवकरच कुणाल देशमुख दिग्दर्शित ‘दिलेर’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं कळतंय.