Saisha Bhoir : सर्व काही गमावलं, आम्हाला न्याय…आर्थिक फसवणूक प्रकरणावर बालकलाकार साईशा भोईरच्या आईचं वक्तव्य

Saisha Bhoir Mother Post : 'रंग माझा वेगळा' मालिकेत दिसलेली साईशा भोईरच्या आईनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आर्थिक फसवणुकीवर भाष्य केलं आहे.

Saisha Bhoir : सर्व काही गमावलं, आम्हाला न्याय...आर्थिक फसवणूक प्रकरणावर बालकलाकार साईशा भोईरच्या आईचं वक्तव्य
| Updated on: Nov 12, 2026 | 5:38 PM

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय बालकलाकार साईशा भोईर गेल्या काही वर्षांपासून मनोरंजनविश्वापासून दूर आहे. ‘रंग माझा वेगळा’ आणि ‘नवा गडी नवं राज्य’ या मालिकांमधील तिच्या अभिनयाला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली होती. मात्र, तिच्या कुटुंबावर ओढवलेल्या आर्थिक आणि कायदेशीर संकटामुळे तिच्या अभिनय कारकिर्दीवरही परिणाम झाला. आता या प्रकरणाबाबत साईशाची आई पूजा भोईर यांनी सोशल मीडियावर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. ‘आम्हाला न्याय मिळाला’, असं म्हणत त्यांनी या संपूर्ण प्रकरणावर भाष्य केलं आहे. काही वर्षांपूर्वी पूजा भोईर आणि तिचे पती विशांत भोईर यांच्यावर कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक फसवणुकीचे आरोप झाले होते. गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचं आमिष दाखवून अनेकांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. या प्रकरणात पूजा भोईर यांना पोलिसांनी अटकही केली होती. त्यामुळे साईशाच्या कुटुंबाची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती.

साईशा भोईरची आई पूजा भोईरनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिलं की, ‘सर्व काही गमावलं???? कदाचित. पण आम्ही पुन्हा एकदा सर्व काही मिळवलं आणि आम्ही असेच आहोत. लोकांनी टीका केली, लोकांनी दोष दिला. लोकांनी स्वतःचे अंदाज बांधले. पण आम्ही?????????? आम्ही शांत राहिलो, प्रार्थना करत राहिलो, आमच्या श्रद्धेवर ठाम राहिलो आणि देवाला आमचे पुनरागमन घडवून आणू दिलं. आम्हाला न्याय मिळाला, बळ मिळालं आणि अशा प्रकारे पुनरागमन झालं, ज्याची आम्ही कल्पनाही केली नव्हती.’

Loading...

‘देव महान आहे, तो तेव्हाही सोबत होता, आजही सोबत आहे आणि सदैव सोबत राहील. आमचं रक्षण करत, आम्हाला मार्गदर्शन करत आणि आपल्या दैवी प्रेमाचा व आशीर्वादांचा वर्षाव करतोय.आम्ही केवळ पुन्हा उभे राहिलो असं नाही, तर आम्ही श्रद्धा, बळ आणि देवाच्या आशीर्वादांसह पुन्हा दणक्यात उभे राहिलो आहोत. देवाचे सदैव खूप आभार…’ असं पूजा यांनी शेवटी म्हटलं आहे.

 

नेमकं काय होतं आर्थिक फसवणूक प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, पूजा भोईर या ‘अल्गो ऑप्शन्स ट्रेडिंग’च्या माध्यमातून गुंतवणुकीचा व्यवसाय करत असल्याचं सांगत होत्या. सोशल मीडियावर ओळख झालेल्या काही लोकांना त्यांनी गुंतवणुकीवर आकर्षक परतावा देण्याचं आश्वासन दिलं होतं. सुरुवातीला काही गुंतवणूकदारांना परतावा मिळाल्याने त्यांचा विश्वास बसला. मात्र, नंतर मोठ्या रकमेची गुंतवणूक केल्यानंतर पैसे परत मिळत नसल्याच्या तक्रारी समोर आल्या. मुंबईतील एका दाम्पत्यानं पूजा भोईर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलिसांनी कारवाई करत त्यांना अटक केली. पुढे नाशिक आणि लातूरसह अन्य ठिकाणांहूनही आर्थिक फसवणुकीच्या तक्रारी समोर आल्या होत्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us