
मोहित सूरी यांच्या दिग्दर्शनाखाली आणि नवोदित कलाकार अहान पांडे व अनीत पड्डा यांच्या अभिनयाने सजलेला ‘सैयारा’ सिनेमा चांगलाच चर्चेत आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर शानदार कामगिरी करत आहे. हा चित्रपट भारतीय सिनेमाच्या सर्वात मोठ्या हिंदी हिट चित्रपटांच्या यादीत अवघ्या २४ तासांत ८४व्या स्थानावरून ६२व्या स्थानावर पोहोचला आहे. आता या चित्रपटाने किती कमाई केली आहे हे जाणून घेण्यासाठी सर्वजण आतुर आहेत.
‘सैयारा’ने या चित्रपटांचे विक्रम मोडले
‘सैयारा’ सिनेमाने ६ दिवसांत एकूण १५३.२५ कोटी रुपयांची शानदार कमाई करून, या रोमँटिक ड्रामाने शाहरुख खानच्या ‘दिलवाले’ (१४८.४२ कोटी रुपये), सलमान खानच्या ‘बॉडीगार्ड’ (१४८.५२ कोटी रुपये) आणि अगदी हाय-प्रोफाइल ‘सालार: सीज फायर – पार्ट १’ (१५२.६५ कोटी रुपये) यांसारख्या बॉलिवूड हिट चित्रपटांना अधिकृतपणे मागे टाकले आहे.
वाचा: 33 व्या वर्षी अभिनेत्रीचं पालटलं नशीब, दुसऱ्यांदा केलं लग्न अन् आता आहे 160 कोटींची मालकीण
‘सैयारा’चे कलेक्शन
‘सैयारा’ने पहिल्या दिवशी २१.५ कोटी रुपयांची धमाकेदार सुरुवात केली होती. या रोमँटिक ड्रामाने शनिवारी २६ कोटी रुपये कमावले आणि रविवारी ३५.७५ कोटी रुपये कमाई केली. जिथे सोमवारी साधारणपणे कमाईत घट दिसते, तिथे ‘सैयारा’ने आठवड्याच्या दिवशीही आपला दबदबा कायम ठेवला आणि २४ कोटी रुपये कमावले. मंगळवारीही चित्रपटाने २५ कोटी रुपयांचा कलेक्शन केला.
‘सैयारा’बद्दल
‘सैयारा’चे निर्माते अक्षय विदवानी यांनी वायआरएफच्या बॅनरखाली हा चित्रपट बनवला आहे. मोहित सूरी यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाने जागतिक बॉक्स ऑफिसवर १८८ कोटींहून अधिक कमाई केली आहे, जी अहान आणि अनीत दोघांसाठीही अत्यंत यशस्वी सुरुवात ठरली आहे. ‘सैयारा’ने बॉक्स ऑफिसवर धमाल उडवल्यानंतर, चाहते आता याच्या सिक्वेलचे स्वप्न पाहत आहेत. मात्र, याबाबत निर्मात्यांकडून अद्याप याबाबत काहीही सांगण्यात आलेले नाही.