Saiyaara : अरे ! ही तर पेटीएमवाली..अनीत पड्डाचा 3 वर्षांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल, ‘सैयारा’च्या वाणीला पाहून यूजर्स हैराण

'सैयारा' चित्रपटामुळे रातोरात स्टार झालेली आणि नॅशनल क्रश बनलेल्या अनित पड्डाची एक 3 वर्षांपूर्वीची जाहिरात व्हायरल होत आहे. ती पाहून अनेक यूजर्स आश्चर्यचकित झाले आहेत. पेटीएम आणि नेस्कॅफेच्या जाहिरातींमध्ये दिसलेला हाँ चेहरा सध्या घराघरात चर्चेता विषय बनला आहे.

Saiyaara : अरे ! ही तर पेटीएमवाली..अनीत पड्डाचा 3 वर्षांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल, सैयाराच्या वाणीला पाहून यूजर्स हैराण
अनीत पड्डाचा 3 वर्षांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल
Image Credit source: social media
| Updated on: Jul 23, 2025 | 3:45 PM

‘सैयारा’ हा बॉक्स ऑफीसवर धूमाकूळ माजवणारा चित्रट सध्या खूप चर्चेत आहे. या चित्रपटातील आहान पांडे आणि अनित पड्डा हे नावंही घराघरात पोहोचलं असून अनीत ही तर ‘नॅशनल क्रश’ बनली आहे. ज्यांनी ज्यांनी आत्तापर्यंत हा चित्रपट पाहिलाय ते अनित पड्डाचे कौतुक करताना थकलेले नाहीत. ‘सैयारा’ चित्रपटात अनित पड्डा हिला वाणीच्या भूमिकेत पाहून लोक रडत आहेत. याचदरम्यान, आता तिची तीन वर्षे जुनी जाहिरात व्हायरल होत आहे. यामध्ये अनित ही ‘मुंज्या’ फेम अभय वर्मासोबत दिसली होती. आश्चर्यत म्हणजे हीच अनित याआधी आपल्याला कधी ‘पेटीएम गर्ल’ म्हणून तर कधी ‘नेस्कॅफे गर्ल’ म्हणून दिसली होती, आता तो रेफरन्स आठवून नेटिझन्सना आश्चर्यचकित झाले आहेत.

अनित पड्डा आणि अभय वर्मा यांनी एका चॉकलेट ब्रँडच्या जाहिरातीमध्ये एकत्र काम केलं होतं. यामध्ये दोघेही एका म्युझिक क्लासमध्ये दिसले आणि खूप मजा करताना दिसले होते. ही जाहिरात पाहिल्यानंतर चाहत्यांना अनितची पेटीएम आणि नेस्कॅफेची जाहिरातही सापडली आणि त्यांनी वेगवेगळ्या कमेंट्स द्यायलाही सुरुवात केली.

ही तर पेटीएम वाली मुलगी

‘ती पेटीएमवाली क्यूटशी मुलगी कुठे गेली बरं, असा विचार मी नेहमी करायचो. आणि ती तर आता ‘सैयारा’मध्ये दिसली. असं एका यूजरने X वर लिहीलं.

 

तर मला आत्ताच हे जाणवलं की ती पेटीएमची जुनी जाहिरात होती, त्यात जी मुलगी दिसायची ती तर ‘सैयारा’ स्टार अनीत पड्डा हीच आहे की, असंही दुसऱ्याने लिहीलं.

 

नेस्कॅफे गर्ल, वेब शो आणि आता चित्रपट

दुसऱ्या एका कमेंटमध्ये लिहिले होते, ‘तू पेटीएम गर्ल झाली,, नेस्केफे गर्ल होतीस आणि सर्वात छान ओटीटी शो करत होतीस. आणि आता यशराज फिल्म्ससोबत 3 चित्रपटांचा करार झाला आहे. कमाल केलीस.’ असं आणखी एकायूजरने अनीतला उद्देशून लिहीलं.

 

 

‘सैयारा’ पूर्वी अनीत पड्डाचे प्रोजेक्ट्स

नायिका म्हणून ‘सैयारा’ हा अनितचा पहिला चित्रपट असला तरी, त्याआधी ती 2022 साली मध्ये काजोलची भूमिका असलेल्या ‘सलाम वेंकी’ मध्ये दिसली होती. त्यानंतर 2024 मध्ये ती ‘बिग गर्ल्स डोन्ट क्राय’ या वेब सिरीजमध्ये दिसली. यामध्ये तिच्यासोबत पूजा भट्ट आणि रायमा सेन देखील होत्या.