शुरा खानचा पास्ट… सलमानसह बहिणींच्या मनात होती ‘ही’ भीती; अरबाजला दिला होता आधीच इशारा

शुरा खानचा पहिला पती आणि मुलीबद्दल मोठी माहिती समोर... ज्या गोष्टीची सलमानसह बहिणींच्या मनात असलेली भीती, अरबाजला दिला होता इशारा... अखेर शुरा खान हिच्या पास्टबद्दल मोठी माहिती समोर आलीच... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शुरा खान हिच्या पास्टची चर्चा...

शुरा खानचा पास्ट... सलमानसह बहिणींच्या मनात होती ही भीती; अरबाजला दिला होता आधीच इशारा
| Updated on: Mar 16, 2024 | 10:47 AM

मुंबई | 16 मार्च 2024 : गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात आर्टिस्ट शुरा खान हिने अभिनेता अरबाज खान याच्यासोबत लग्न केलं. फार कमी लोकांच्या उपस्थितीत दोघांचा विवाह सोहळा पार पडला. शुरा आणि अरबाज यांच्या लग्नाचा धक्का चाहत्यांना देखील बसला. कारण दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा कुठेच रंगल्या नाही. थेट अरबाजच्या दुसऱ्या लग्नाची बातमी समोर आल्यामुळे अनेकांना धक्का बसला. अरबाज दुसरं लग्न करत असल्याची माहिती समोर आल्यानंतर अभिनेत्याची दुसरी पत्नी कोण? अशा अनेक चर्चा रंगू लागल्या.

आता शुरा खान हिच्याबद्दल मोठी माहिती समोर येत आहे. अरबाजच्या बहिणी अलवीरा आणि अर्पिता यांना शुरा आवडत नव्हती. एवढंच नाहीतर, सलमान खान याने अरबाजला लग्नसाठी पुन्हा विचार करण्याचा सल्ला दिला होता. सध्या सर्वत्र शुरा हिच्या पास्टची चर्चा रंगली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुरा खान हिच्या पास्टमुळे खान कुटुंबात आनंद नव्हता. शुरा खान हिचं पहिलं लग्न एका इंटेरियर डिझायनर सोबत झालं होतं. शुरा खानला एक मुलगी देखील आहे. रिपोर्ट्सनुसार, शुराची मुलगी तिच्याजवळ आहे. शुरा लेकीला तिच्या वडिलांना भेटू देत नाही.

सुरुवातीला शुराच्या पास्टबद्दल खान कुटुंबाला माहिती नव्हतं. मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खानने अरबाजला लग्नाचा पुन्हा विचार करण्याचा सल्ला दिला होता. पण अरबाज याने निर्णय घेतला होता, ज्यामुळे खान कुटुंबिय देखील अरबाजच्या लग्नासाठी पोहोचले होते.

अरबाज याने कधीच शुरा हिला डेट करत असल्याची माहिती समोर येऊ दिली नाही. त्यामुळे शुरा आणि अरबाज यांच्या लग्नाने चाहत्यांना देखील धक्का बसला. अरबाज याच्या दुसऱ्या लग्नात मुलगा अरहान खान देखील उपस्थित होता. लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.

अरबाज खान याचं दुसरं लग्न

अरबाज खान याने पहिलं लग्न अभिनेत्री मलायका अरोरा हिच्यासोबत केलं होतं. पण दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही. अखेर अरबाज – मलायका यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. लग्नाच्या 18 वर्षांनंतर अरबाज – मलायका यांचा घटस्फोट झाला. पण मुलासाठी दोघांना अनेकदा एकत्र येताना स्पॉट करण्यात आलं. अरबाजसोबत घटस्फोट झाल्यानंतर मलायकाच्या आयुष्यात अभिनेता अर्जुन कपूर याची एन्ट्री झाली.